Home > पर्सनॅलिटी > ‘तो’ २५ हजारांचा बोनस आणि लॉकडाऊनचा खाऊ

‘तो’ २५ हजारांचा बोनस आणि लॉकडाऊनचा खाऊ

‘तो’ २५ हजारांचा बोनस आणि लॉकडाऊनचा खाऊ
X

लॉकडाऊच्या काळात गरजूंना मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. एकामागोमाग येणाऱ्या संकंटामधून याच हातांनी अवघा देश सावरला आहे. महापुर असो वा कोरोनाचं संकट कोणी जीव धोक्यात घालून मदतीसाठी धावतो, तर कोणी या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या स्वयंसेवकांना आर्थिक पाठबळ देत सहाय्य करतात. आपण या सर्व संकटावर मात करतो आहोत.

याच संकटात एक मदतीचा हात कायमचा मनावर कोरला गेलाय़. या लॉकडाऊनच्या काळात मन हळवं करणारा अनुभव एका महिलेच्या निस्वार्थ भावनेतून दिलाय आणि तिच्या कार्याला सलाम करताना या खऱ्या ‘मॅक्सवुमन’चा किस्सा तुमच्या पर्यंत पोहोचवत आहोत.

पुण्यातील हिंजेवाडीतील ख्याती वालवीया हिचा हा किस्सा आहे. ‘क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे’या उक्तीचा जणू पाठच सर्वांना दिलाय. ख्यातीच्या सोसायटी जवळ एक ३०ते ३५ लोकांची वस्ती आहे. सर्वजण परप्रांतीय. ख्यातीचा काल पगार झाला तिने जास्त कामं केल म्हणुन तब्बल २५,००० बोनस मिळाला. मग तिने फारच अभिनव उपक्रम केला तिला जे आवडतं असं तिने १७ ते २० लहान मुलांसाठी बनवून घेतले सकाळी जवळच्या वस्तीत गेली आपल्याला बघुन आश्चर्य वाटेल लहान मुलांनी जे स्वप्नात पण बघीतले नाही ते त्यांना पोटभर जेवायला दिले.

बस इतकचं.. यात काय विशेष असं बरेच जण करतात. त्यात काय नवलं. होय ना.. खरं तर हे सर्व करण्यामागचं कारण जेव्हा ख्यातीने सांगितलं तेव्हा ते ऐकून मन थक्क झालं.

तीला विचारलं की आजच काय विशेष इतके चांगले जेवण आणी तेही फक्त लहान मुलांना.. तेव्हा तीचं उत्तर होतं ‘मी परदेशात असतांना वर्षापुर्वी माझी ४ वर्षाची मुलगी व पती कार अपघातात मरण पावले. तो आजचा दिवस.’

स्वत:चं दुख विसरुन मदतीसाठी धावणाऱ्या या मॅक्सवुमन चा सार्थ अभिमान. सोबतच कोरोनाच्या लढाईतही सामान्यांसाठी झटणारे अनेक हिरो समोर आले त्यांचेही आभार. आपण कोणाला मदत करत आहोत हे ही माहिती नसताना ते फक्त हाडामांसाच्या माणसासाठी झटत आहेत. इथे जात, धर्म, गरिब, श्रीमंती सर्व काही गळून पडलंय.

Updated : 30 April 2020 5:30 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top