यशोगाथा : कोरोनाला गावच्या वेशीवर आव्हान देणारी सरपंच रिताताई सुखदेवे
X
काही गावांनी सुरूवातीपासूनच चांगल्या उपाययोजनांमुळं या गावांमध्ये कोरोना संसर्ग नाहीय. अशीच एक भंडारा जिल्ह्यातलं मानेगाव-झबडा ही गट ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत रिताताई सुखदेवे. रिताताई सुखदेवे यांनी अंगणवाडी सेविका, आरोग्य सविका आणि गावातील काही तरुणांना एकत्र करुन आपत्ती व्यस्थापन समिती तयार केली. या समिती मार्फत त्यांनी गावात जनजागृती, सॅनीटॅझेशन अशी कामं केली. रिताताईंच्या या प्रयत्नांमुळे आज गावात कोरोना नियंत्रण शक्य झालं व गाव सुरक्षीत आहे. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोनाच्य़ा संकट काळात आपापल्या परिने गरजूंना मदत करण्यासाठी काही रणरागिणींनी आपल्या जीवाची परवा न करता समाजकार्य केले. आपल्याकडे जे आहे त्यामधून इतरांना मदत करण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. याच संस्कृतीचे पालन करत राज्यातील काही रणरागिणींनी आपापल्या क्षेत्रातील कामाच्या व्यापातून वेळ काढत गरजूंना लॉकडाऊनच्या काळात मदत केली. या महिलांच्या याच कार्याची दखल घेत मॅक्स वुमन आणि महिला व बालविकास विभागातर्फे या कोरोना रणरागिणीचा गौरव करण्यात आला. यावेळी महिला व बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते या हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन उपस्थित होत्या.