Home > पर्सनॅलिटी > लेडी सिंघम - ज्योतीप्रिया सिंह

लेडी सिंघम - ज्योतीप्रिया सिंह

लेडी सिंघम - ज्योतीप्रिया सिंह
X

चित्रपटांमुळे तयार झालेली पोलिसांची इमेज बदलण्याचा प्रयत्न करतेय असं जरी त्या म्हणत असल्या तरी 'लेडी सिंघम' म्हणून ज्योतीप्रिया सिंह यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातं. गुन्हेगारांसाठी त्या जेवढ्या आक्रामक आहेत तितक्याच त्या एक प्रेमळ गृहीणी आहेत. मी मुळची उत्तरप्रदेशातून आलीय, त्यामुळे कुठेही बदली करा, मला संपूर्ण महाराष्ट्र सारखाच आहे असं त्या सांगतात. आत्तापर्यंत अहमदनगर, कोल्हापूर, जालना सारख्या विविध कारणांनी संवेदनशील असलेल्या जिल्ह्यात पोलीस अधिक्षिका म्हणून त्यांनी काम पाहिलंय.

दुष्काळी भागात मोठ्या प्रमांणावर बेरोजगारी निर्माण झाल्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाणही वाढतंय, ते आटोक्यात ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत ज्योतीप्रिया सिंह यांनी घेतलीय. महिला, वृद्ध, लहान मुलं यांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही त्यांच्या अजेंड्यावर सर्वांत वर आहे. परीक्षांच्या काळात वाढते छेडछाडीचे प्रकार बघून त्यांनी जिल्ह्यात दामिनी पथके सुरू करून त्याला पुरेसा मनुष्यबळ दिलं. महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या अॅप ला शहरी भागात चांगला प्रतिसाद आहे, आता ग्रामीण भागात त्याचा प्रसार करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

समाजामध्ये नेमकं काय चाललंय याची माहिती मिळावी म्हणून विविध व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये पोलिसांची पेरणी, स्वत: सोशल मिडीयावर उपलब्ध असणं, सर्व धर्मीय लोकांबरोबर सौहार्दाचं नाते जरी त्या ठेवत असल्या तरी त्यांच्या नावाची दहशतही कायम आहे.

पोलीस खात्यात नव्याने भरती झालेल्या तरूण-तरूणींचे कल लक्षात घेऊन त्यांचा पोलिसींग साठी वापर त्या करून घेतात. व्हिजीबल पोलिसींग सोबत सीसीटीव्हीची संख्या वाढवणे, व्हॉटसअॅप ग्रुप द्वारे लक्ष ठेवणं, गुन्हेसिद्धप्रमाण वाढवण्यासाठी पुराव्यांचं शास्त्रीय पद्दतीने जतन अशा बरेच उपक्रम त्या राबवतात. पोलिसांना कायद्याचं ज्ञान असावं म्हणून माजी न्यायाधीशांमार्फत पोलीसांचे ट्रेनिंग ही त्या आयोजित करत असतात.

राजकीय दबाव येत नाही का काम करत असताना? असं विचारल्यावर माझ्याकडे बघून असं वाटतं का कोणी दबाव टाकेल असं मिष्कील उत्तरही त्या देतात. आपला रिकामा वेळ बॅडमिंटन खेळण्यात तसंच मुलांच्या संगोपनात घालवायला त्यांना आवडतं.

Updated : 7 March 2019 10:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top