Home > पर्सनॅलिटी > #KingMaker : विजया आबिटकर

#KingMaker : विजया आबिटकर

#KingMaker : विजया आबिटकर
X

आज आपण जाणुन घेणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदारसंघातील किंगमेकर म्हणजेच आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पत्नीविषयी.

पती राजकारणात सक्रिय असताना विजया आबिटकर यांनी आपले घर सांभाळून समाजसेवेला देखील प्राधान्य दिलं. आपलं घर हे चार भिंती पुरतचं मर्यादीत नसून आपण राहतो तो संपूर्ण परिसरचं आपलं घर आहे. अशी भावना मनात बाळगून त्यांनी अनेक गरजूंना वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मदत केली आहे.

कोल्हापुर जिल्ह्यातील बानगे या गावातील इंडीयन आर्मीमध्ये कार्यरत असणाऱ्या विलास पाटील यांच्या घरी ६ नोव्हेंबर १९८१ साली विजया आबिटकर यांचा जन्म झाला. घरात अतिशय शिस्तबद्ध वातावरण असल्याने. प्राप्त परिस्थितीत आंनद निर्माण करण्याची कला उपजतच त्यांना मिळाली. त्यामुळे सासरच्या राजकारणी वातावरणात रूळायला जास्त वेळ लागला नाही. १९ वर्षाच्या विजया यांचा २००१ साली प्रकाश आबिटकर यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर त्यांनी M.Com पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यांनी स्थानिक पातळीवर समाजसेवा करून आपली वेगळी ओळख निर्माण केली.

विजया आबिटकर यांनी आबिटकरांच्या आईंच्या नावावर असलेल्या ‘सुशीलादेवी आबिटकर फांउडेशन’च्या माध्यमातून अनेक गरीब, निराधार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. लघू वस्त्रद्योग तसेच ताराराणी बचत गटांच्या माध्यमातून महिला रोजगारांना चालना दिली आहे. त्यांच्या नेतृत्वांतर्गत गोरगरीब आणि गरजू लोकांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचे उपक्रम राबवण्यात आले आहेत.

घर आणि समाजकारणात सक्रिय होऊन विजया आबिटकर यांनी समाजात आपुलकीची नाती जोडली. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये राधानगरी मतदार संघात एकूण १२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पहायला मिळाली. मात्र, येथील मतदारांनी सलग दुसऱ्यांदा शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांना आमदार म्हणून बहुमताने निवडून दिले आहे.

प्रकाश आबिटकर यांनी गेल्या पाच वर्षात गावांमध्ये अनेक विकासाची कामे घडवून आणलीत. पाण्याचे तसेच रस्त्यांचे प्रश्न सोडवले. तालुक्यांमध्ये अनेक उपक्रम राबवले. त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांनी आपले मत आबिटकरांच्या पारड्यात टाकले आहे.

आबिटकर यांच्या पत्नी विजया आबिटकर यांनी प्रचारात सक्रिय राहून अनेक गांवामध्ये पदयात्रा काढली. लोकांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि आपल्या पतीला मत देण्याचं आवाहन केलं. यासंदर्भात ‘मॅक्स वुमन’शी बोलताना विजया आबिटकर यांनी प्रचारादरम्यान अनुभवलेला किस्सा सांगितला. तेव्हा त्या म्हणाल्या की, “जेव्हा आम्ही प्रचार सभेदरम्यान, लोकांची भेट घेत होतो, तेव्हा आम्हाला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. साहेबांनी केलेल्या विकास कामांमुळे अगदी वृद्ध महिला देखील आपल्या तालुक्यातील आमदार कोण असं विचारलं असता, ‘आमदार प्रकाश अबिटकर’ यांचं नाव घेत होत्या. ही खरचं फार कौतुकाची बाब आहे.”

#KingMaker विजया आबिटकर

Updated : 2 Nov 2019 2:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top