सुहासिनी निकम... एक महिला व्यावसायिक म्हणून आज त्यांची ओळख आहे. आपली जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या भांडवलावर त्यांनी आपल्या पतीने उभा केलेला व्यवसाय वाढवला. पतीच्या आणि सासऱ्यांच्या निधनानंतर सुखी संसाराची वाताहत झाली. मात्र, केवळ आपल्या पतीच्या प्रेमापोटी त्यांनी मेहनतीने आणि जिद्दीने उभा केलेला व्यवसाय त्यांच्या मृत्यूनंतर कोलमडू द्यायचा नाही, हेच स्वप्न उराशी बाळगून कामाला लागल्या.
आज त्या खंबीरपणे उभ्या आहेत सोबतच इतरांनीही आपल्या पायावर उभं राहावं या उददेशातून अनेक महिलांना आधार देत आहेत. पाहा सुहासिनी यांच्या जिद्दीची कहाणी...
https://youtu.be/8p58JyUCrzo
Updated : 15 March 2020 5:15 AM GMT
Next Story