Home > पर्सनॅलिटी > लाईटच्या पोलवरची बिजली ‘उषा जगदाळे’

लाईटच्या पोलवरची बिजली ‘उषा जगदाळे’

लाईटच्या पोलवरची बिजली ‘उषा जगदाळे’
X

आतापर्यंत तुम्ही अनेक पुरुषांना लाईच्या पोलावर चढून काम करताना पाहिलं असेल पण कधी एखाद्या बाईला लाईटच्या पोलवर चढलेली पाहिली आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला असाच एका महिलेची ओळख करुन देणार आहोत. ही महिला आहे. "महाराष्ट्र गौरव" पुरस्काराच्या मानकरी उषा जगदाळे.

या कामातील पुरुषांची मक्तेदारी मोडणाऱ्या उषा जगदाळे यांचा जन्म बीडच्या आष्टी तालुक्यातील शेतकरी कुटुंबात झाला. शालेय जिवानापासूनच उषाच्या अंगी असणाऱ्या मैदानी, खेळाडू वृत्तीची दखल संजय सोले सर यांनी घेत तिला प्रोत्साहन दिले. पुढे माध्यमिक शिक्षणात इयत्ता पाचवीपासून विष्णू आदनाक सरांनी खेळ कौशल्यांची जोपासना करीत विविध स्पर्धांची तयारी केली.

अंगी असलेल्या खिलाडू वृत्तीमुळे राष्ट्रीय पातळीवर खो - खो या खेळात उषा यांना तब्बल अकरा सुवर्णपदकं मिळाली आहेत. एवढचं नाहीतर राज्यस्तरीय महाराष्ट्र टीमची कर्णधारपदही उषा यांनी भूषवलं आहे. घरच्या परिस्थितीमुळे उषाला पुढील शिक्षण घेता आलं नाही. विवाहानंतर उषाने पतीच्या खांद्याला खांदा लावत पतीला दुध व्यवसायात मदत केली.

एकदा बँकेत नोकरीचा अर्ज करण्यासाठी गेली असता तिथे महावितरणची जाहिरात वाचली. आपल्या खेळाच्या मेरीटवर २०१३ साली महावितरणची जाहीरात निघाली आणि खेळाडू कोट्यातून महावितरणमध्ये " तंत्रज्ञ " म्हणून निवड झाली. पण त्याआधी खरंतर महावितरण म्हणजे काय? हे देखील तेव्हा मला माहिती नव्हतं.” असं उषा सांगतात.

दरम्यान, आज कोरोनाच्या महामारीत त्या जे काम एखाद्या पुरुषाला लगेच जमणार नाही, असं काम करत असल्याने त्यांची महावितरणच्या वाघीण म्हणून ओळख होत आहे.

Updated : 18 Aug 2020 4:09 AM GMT
Next Story
Share it
Top