Home > पर्सनॅलिटी > बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी प्रतिभा शिंदेच्या शब्दात

बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी प्रतिभा शिंदेच्या शब्दात

बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी प्रतिभा शिंदेच्या शब्दात
X

१९९९ च्या सप्टेंबर महिन्यात सरदार सरोवर मधे प्रचंड डूब आलेली शेकडो गाव व हजारो घरे पाण्या खाली गेलेली त्या वेळेस नर्मदा घाटीत अरुंधती रॉय यांनी आपल्या साथीदारा सह दौरा केला होता आणि लोक संघर्ष मोर्चा मुंबई येथे ह्या जबरण विस्थापना विरूद्ध आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत होतो ह्या वेळी मा. बाळासाहेब ठाकरे यांची त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघात प्रेस कॉन्फरन्स सुरू होती, आझाद मैदानावरील आमच्या लाऊड स्पीकर चा प्रचंड आवाज येत असल्याने काही शिवसैनिकांनी आमच्या लाऊड स्पीकर चे कनेक्शन तोडून टाकले आणि मा. बाळा साहेबांची प्रेस कॉन्फरन्स मधे व्यत्यय नको म्हणून शिव सैनिकांनी केलेली ही आगळीक होती . आम्हाला ह्याचा भयंकर राग आला आणि आम्ही त्यांच्या पत्रकार परिषदेत ५० महिला घोषणा देत घुसलो " साहेब तुमचा मतदाना चा अधिकार गेला तर इतके आंदोलन आणि आमचा भाकरीचा अधिकार हिरावून घेत असताना मात्र आमचा आवाज ही तुमचे शिव सैनिक दाबून टाकतात "म्हणत जोरदार घोषणा बाजी केली त्या वेळी शिवसैनिक आमच्या अंगावर धावून आलेत तेव्हा बाहेरील गोंधळ ऐकुन मा. बाळा साहेब यांनी आम्हाला प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलावून घेतले त्या वेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे ही त्यांच्या सोबत होते, महिलांचे रणरागिणी रूप बघून ते जाम खुश झालेत व त्यांनी दुसऱ्या दिवशी ११ वाजता मातोश्री वर बोलावले.

दुसऱ्या दिवशी मातोश्री वर बबनराव घोलप यांना तिकीट द्या व देवून नका असे दोन ग्रुप प्रचंड ताकदीने मातोश्री वर आलेले खूप सारे आमदार बाहेर प्रतीक्षेत बसलेले आम्ही मातोश्री वर गेलो असता मा.बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री नारायण राणे यांना व धुळे जिल्ह्यातील संबंधित धरमचंद चौरडिया यांना बोलावून ठेवले होते, आमच्या प्रत्येक आदिवासी नेत्याची अत्यंत आस्तेिवाईक रित्या चौकशी केली प्रत्येकाला नाष्टा करायला लावला प्रश्न समजून घेतलेत आणि नारायण राणेंना प्रश्न सोडवण्यासाठी अनेक आदेश दिले( निवडणुकीच्या धामधुमीत प्रश्न प्रलंबित राहिले व पुढे सरकार गेले) ह्या वेळी ते मला म्हणालेत "पोरी तू ज्या विचारधारेची आहेस ना त्यांनी काय दिले येथल्या सामान्य माणसाला? मी इथल्या साळी- माळी - कोळी अश्या बारा बलुतेदार जातींना राज्यकर्ती जमात बनवलं आमदार केले, तुझ्या विचारांचे समाजवादी आणि काँग्रेस (आत्ता काँगेस आणि आपल्या विचारांची?) तुम्हाला फक्त टाचा घासून मारून टाकतील तू इकडे ये मी तुझा योग्य सन्मान करतो. मी त्यांना अत्यंत नम्र पणे म्हणाली "साहेब काही लोकांचा जन्म टाचा घासून मरण्या साठीच असतो आणि त्याचा मला सार्थ अभिमान ही आहे" त्यांनी अत्यंत प्रसन्न पणे माझ्या बोलण्याला दाद देत सांगितले ह्या निडर वागण्याचे कौतुक आहे मला कधीही अडचण आली की ये भेटायला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मा.उध्दव साहेबांना बाहेर पर्यंत सोडायला सांगितले त्या वेळेच्या लोकमत पेपरने ही बातमी महाराष्ट्रात हेड लाईन केली होती.

मा.बाळासाहेबांनी अत्यंत जिव्हाळा ,आपुलकी ने आमच्या नेत्यांशी केलेला संवाद आमच्या आंदोलनकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या घुसखोरीचे त्यांनी केलेले कौतुक ,ते व्यक्तिमत्व नक्कीच भुरळ घालणार होत अत्यंत ताकदीच व्यक्तिमत्व व नेतृत्व

मा.बाळासाहेबांच्या स्मृती दिनी त्यांना भावपूर्ण आदरांजली

साभार - प्रतिभा शिंदे यांच्या फेसबुक वॉल वरून शिवसेना

Updated : 18 Nov 2019 2:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top