Home > पर्सनॅलिटी > कमी वयातील दर्जेदार साहित्याची नवी 'संहिता'

कमी वयातील दर्जेदार साहित्याची नवी 'संहिता'

कमी वयातील दर्जेदार साहित्याची नवी संहिता
X

आपण जेव्हा काहीतरी लिहायला जाता तेव्हा खुपवेळा मुळ विषय बाजूला राहून इतर पसारा जास्त होऊन जातो. तुमचा विषय आणि त्या विषया संदर्भातील लेखन याची कुठेच लिंक लागत नाही. लेखन सर्वांनाच जमत नाही कारण ती एक कला आहे. त्यासाठी संवेदना असव्या लागतात भुमीका असावी लागते. त्यामुळे फार कमी लोक लेखक/लेखिका बनतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका लेखिकेची ओळख करुन देणार आहोत. जीचं वय फक्त 18 वर्षे आहे. आणि या वयात इंग्रजी भाषेत तिची एक दोन नाही तर चार पुस्तकं प्रकाशीत झाली आहेत.

या तरुण लेखिकेचं नाव आहे संहिता सोनावणे. अस्सल मराठमोळ्या संहिता अंबरनाथच्या रहिवासी आहेत. घरची परिस्थितीही सामान्यच. संहिता यांना लेखनाचा हा वारसा त्यांच्या दोन आजोबांकडून आला आहे. त्यांचे एक आजोबा विजय सोनावणे हे बौद्ध साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांची बौद्ध कला आणि साहित्यावर अनेक पुस्तकाही प्रकाशीत झाली आहेत.

तर दुसरे आजोबा सुनील सोनावणे हे देखील कवी आणि साहित्यिक. त्यांचेही अनेक कविता संग्रह आणि पुस्तके प्राकाशित झाली आहेत. असं असलं तरी संहिता यांना लेखनाची प्रेरणा दोनही आजोबांकडून नाही तर आत्याकडून आली आहे. आहे न कहानी में ट्वीस्ट..

संहिता यांची आत्या प्रा गाथा सोनावणे या देखील लेखिका आहेत. गाथा यांचीसुध्दा तरुण वयात अनेक पुस्तके प्रकाशीत झाली त्यामुळे घारत त्यांचं खुप कौतुक होतहेतं. कुटुंबात तिला विशेष स्थान मिळत असल्याचे संहिता यांच्या मनात बसलं आणि त्याच वेळी त्यांनी ठरवलं आपण लेखिक व्हायचं.

आज वयाच्या 18 व्या वर्षी संहिता यांची इंग्रजी भाषेत दोन पुस्तके, एक कादंबरी आणि एक कविता संग्रह प्रकाशीत झाला आहे.

बालपणीची एक आठवण सांगताना संहिता म्हणतात की, "मी अगदी न कळत्या वयात असेल तेंव्हा माझे आजोबा लिखाण करून झाले की त्यांचे पेन हे माझ्या हातात द्यायचे, तिथूनच थोडं थोडं लिहायची सवय लागली होती."

त्यांच्या "इनारा" व "सोडेड" पुस्तकांचं वैशिष्ट म्हणजे त्या कधीच ग्रीक किंवा स्कॉटलंडला गेलेल्या नाहीत. पण तरिही त्यांची "इनारा" ही कादंबरी ग्रीकच्या संस्कृती सभोवती फिरते तर दुसरी तिची "सोडेड" ही कादंबरी स्कॉटलंडमध्ये आकार घेते.

जिच्या नावातच लेखनाचा संदर्भ आहे अशा संहिता सोनावणे यांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा..

3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त सर्वत्र हा दिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. सावित्रीबाईंनी स्त्रीयांच्या शिक्षणासाठी दिलेल्या योगदानामुळेच अशा महिला घडत आहेत.


Updated : 26 Dec 2020 1:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top