Home > पर्सनॅलिटी > स्त्रियांच्या मुठी जेव्हा वळतात तेव्हा क्रांती समीप असते

स्त्रियांच्या मुठी जेव्हा वळतात तेव्हा क्रांती समीप असते

स्त्रियांच्या मुठी जेव्हा वळतात तेव्हा क्रांती समीप असते
X

सध्या सोशल मीडियावर जीप चालवणाऱ्या 62 वर्षीय आजींचा एक फोटो खुप व्हायरल होतोय. हा फोटो सिंघू बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील असून जीप चालवणाऱ्या 62 वर्षाच्या आजींच नाव मंजीत कौर असं आहे. या आजी गाडी चालवत असून त्यांच्या सोबत गाडीत इतरही महिला आहेत.

हा फोटो 'किसान एकता मोर्चा' या ट्वीटर हॅंडलवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. फोटो शेअर करताना त्याल "62 वर्षाच्या मंजीत कौर या पटियाला ते सिंघू बॉर्डरपर्यंत स्वत: गाडी चालवत आल्या आहेत." अशा आशयाचे कॅप्शन देण्यात आलं आहे.

दरम्यान, सिंघू बाॅर्डर वर गेल्या २५ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. कडाक्याच्या थंडीत शेतकरी रस्त्यावर झोपत आहे. मात्र, सरकार या आंदोलक शेतक-यांच्या मागणी कडे दुर्लक्ष करत आहे.

Updated : 2020-12-23T14:31:05+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top