Home > News > झीशानला करायचंय वजन कमी..! ट्विटरवर कमेंटचा पाऊस…

झीशानला करायचंय वजन कमी..! ट्विटरवर कमेंटचा पाऊस…

झीशानला करायचंय वजन कमी..! ट्विटरवर कमेंटचा पाऊस…
X

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकजण कामाच्या मागे पळत असतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्यायला सहसा वेळ मिळत नाही. अनेक जण नववर्षाच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देण्याचा संकल्प करतात. त्यासाठी जीम, व्यायाम, डाएटला सुरूवात करतात. मात्र हा संकल्प धावपळीच्या जीवनात दोन-चार दिवसातच मोडला जातो.

नववर्षाला सुरूवात झाली आहे, आणि असाच काही आरोग्यवर्धक संकल्प महाविकास आघाडी सरकार मधील सर्वात तरुण आमदारांपैकी असलेले काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी यांनी केलाय. झीशान यांनी ट्विटरवर एक भन्नाट ट्विट केलंय. झीशानने या ट्विट मध्ये "मी उद्यापासून नियमित व्यायाम आणि डाएटला सुरूवात करतोय. तुमच्या डाएट बद्दल काही सुचना?" असं लिहीलं आहे.

झीशानच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी सुचना वजा कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. अनेकांनी झीशानला त्याच्या या नव्या संकल्पासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, तर अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी तर झीशानला काय खावं आणि किती खावं इथपासून ते कोणता व्यायाम किती करावा अशा सुचना देखील केल्या आहेत. लोकांच्या सुचनांवर झीशान सुद्धा व्यक्त होत आहे. लोकांनी त्याला केलेल्या सुचनांवर तो मजेशीर प्रतिक्रीया देत आहे.

एका ट्विटर वापकर्त्याने झीशानला रोज बिर्याणी खाण्याचा सल्ला दिलाय, त्यावर झीशानने हे कसला सल्ला आहे भाई अशी उपहासात्मक प्रतिक्रीया दिली आहे. तर एका ट्विटर वापरकर्त्याने तू जो संकल्प केलायस तो, तसाच करत राहा अशी प्रतिक्रीया दिली आहे. त्यावर झीशान याने हा योग्य प्लान आहे असं अशी प्रतिक्रीया दिली आहे.

Updated : 7 Jan 2021 2:54 PM GMT
Next Story
Share it
Top