Home > News > युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ट्रोल, कोण आहे कोरियोग्राफर मित्र ?

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ट्रोल, कोण आहे कोरियोग्राफर मित्र ?

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ट्रोल, कोण आहे कोरियोग्राफर मित्र ?
X

टीम इंडियाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. धनश्री वर्मा उत्कृष्ट डान्सर असून ती 'झलक दिखला जा' च्या सीझन 11 मध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये धनश्रीने आपल्या डान्सच्या माध्यमातून जजसह सर्वांना वेड लावलं होतं. तिच्या डान्स स्टाईलला सर्वांकडून खूप चांगली पसंती मिळाली. धनश्रीचे चाहते कौतुक करत तिला शुभेच्छा देत आहेत. तिने इन्स्टा स्टोरीवर चाहत्यांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा शेअर केल्या. पण, तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या कोरिओग्राफर मित्रासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, जो व्हायरल झाला असून त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

या फोटोमध्ये तरुणाने धनश्रीला मिठी मारली आहे. यामुळे सोशल मीडियावर काही लोकांकडून टीकात्मक कमेंट्स आणि मीम्स केल्या जात आहेत. ट्रोलर्सनी या प्रकरणी युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) देखील ओढले असून ते धनश्रीबद्दल (Dhanashree Verma) नकारात्मक पोस्ट करत आहेत.

फोटोमधील तरुण प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रतिक उतेकर आहे. तो भारतीय रिअॅलिटी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सुप्रसिद्ध आहे. त्याने डान्स इंडिया डान्स (डीआयडी) लिटल मास्टर्स, इंडियाज गॉट टॅलेंट, डान्स चॅम्पियन्स आणि नच बलिए यांसारख्या अनेक डान्स शोसाठी कोरिओग्राफी केली आहे.

प्रतिक उतेकरने १७ व्या वर्षी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्याने कोरिओग्राफीसाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. डान्स दीवाने ज्युनिअरच्या पहिल्या सीझनची ट्रॉफी जिंकणाऱ्या आदित्य पाटीलचा कोरिओग्राफर प्रतीक उतेकरच होता. तो त्याच्या अनोख्या कल्पनांसाठी ओळखला जातो आणि त्याने अनेक डान्सर्सना डान्स स्पर्धांमध्ये विजेता बनण्यासाठी मदत केली आहे.

Updated : 3 March 2024 11:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top