Home > News > भुकेलेल्या जीवांसाठी एक दिवस "रोटी डे "

भुकेलेल्या जीवांसाठी एक दिवस "रोटी डे "

भुकेलेल्या जीवांसाठी एक दिवस रोटी डे
X

14 फेब्रुवारी म्हटलं की आपल्यातील प्रत्येकाला व्हॅलेंटाईन डे आठवतो, प्रेमाचा दिवस म्हणून अखंड जगभरात हा दिवस साजरा केला जातो . आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देऊन किंवा आपलं प्रेम त्यांना वेगवेगळ्या मार्गाने दाखवून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो . पण रायगड मधील 'युवा अस्मिता फाउंडेशन'ने वेगळ्या प्रकारे 14 फेब्रुवारी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

14 फेब्रुवारीला "व्हॅलेंटाईन डे" म्हणून ओळखले जाते .पण युवा अस्मिता फाउंडेशन त्याच दिवशी "रोटी डे"साजरा करतात.महाड -रायगड मध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे .भुकेल्यांच्या पोटाला रोटी देऊन आपल्या समाजाप्रती असणारं प्रेम त्यांच्या या उपक्रमामुळे दिसून येत आहे . गेली अनेक वर्ष युवा अस्मिता फाउंडेशन हा उपक्रम राबवत आहे.

सामान्यतः व्हॅलेंटाईन डे दिवशी महागडी गिफ्ट तरुणाईला आकर्षित करतील ,अशा वस्तूंनी मार्केट गजबजलेले असते . पण या सगळ्याला बगल देत भाकरी म्हणजेच रोटी देऊन भुकेल्या मुलांचं पोट भरण्याचं काम युवा अस्मिता फाउंडेशन करत आहे. याच मुलांसाठी तुम्ही सुद्धा आर्थिक मदत करू शकता. जगभरातून या भुकेल्या मुलांची भूक भागवू शकता आणि खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस साजरा करण्याचा आनंद तुम्हीही घेऊ शकता.

Updated : 7 Feb 2023 7:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top