Home > News > 'बाबांनी आदेश दिला नसता तर मी कदाचित राजकारणात आले नसते'; यशोमती ठाकूर झाल्या भावूक

'बाबांनी आदेश दिला नसता तर मी कदाचित राजकारणात आले नसते'; यशोमती ठाकूर झाल्या भावूक

बाबांनी आदेश दिला नसता तर मी कदाचित राजकारणात आले नसते; यशोमती ठाकूर झाल्या भावूक
X

मुंबई: महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत भावुक पोस्ट शेअर केली आहे, बाबांनी आदेश दिला नसता तर मी कदाचित राजकारणात आले नसते, असेही त्या म्हणाल्या. ठाकूर यांनी आपले वडील भैय्यासाहेब ठाकूर यांच्या स्मृतिदिन निमित्ताने ही पोस्ट केली आहे.

मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, 'बाबांनी आदेश दिला नसता तर मी कदाचित राजकारणात आले नसते, मंत्री झाले नसते. माझं दु:ख मला आभाळाएवढं वाटत होतं.

बाबांनी मला माझ्या दु:खातून बाहेर काढत लोकांचे अश्रू पुसण्याचा आदेश दिला. लोकांची दु:ख दूर करण्यासाठी झटण्याचा मार्ग दाखवला. आज बाबा असते तर त्यांनी निश्चितच मला सांगितलं असतं हा एक टप्पा आहे, अजून खूप चालायचंय.



बाबांच्या आठवणींची शिदोरी सोबत आहे. बाबा मी तुम्हाला वचन देते, शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करेन. लोकांची सेवा करत असताना जर मी कधी चुकले तर तुमच्या या मुलीचा कान पकडण्यासाठी बाबा, आज तुम्ही हवे होतात, असं म्हणत त्या भावूक झाल्यात.

Updated : 5 July 2021 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top