Home > News > तरुणांनी पुतळ्यांऐवजी 'वाचनालय' उभारावे: मोक्षदा पाटील

तरुणांनी पुतळ्यांऐवजी 'वाचनालय' उभारावे: मोक्षदा पाटील

तरुणांनी पुतळ्यांऐवजी वाचनालय उभारावे: मोक्षदा पाटील
X

औरंगाबाद: अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे मंगळवारी अज्ञातांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना केल्याने गावात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुतळे आणि त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. अशा वेळी औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी "तरुणांनी पुतळे उभारण्यापेक्षा वाचनालय उभारावे" असा सल्ला दिला आहे.

कोणत्याही महापुरुषांचा पुतळा बसवण्यासाठी जिल्हास्तरीय पुतळा समिती च्या मान्यतेशिवाय राष्ट्रपुरुष-थोर व्यक्तींचे पुतळे उभारता येत नाहीत. मात्र असे असतानाही अनेक ठिकाणी अनधिकृतपणे पुतळे बसवण्यात येत असल्याचा घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यात तब्बल 55 अनधिकृत पुतळे बसवण्यात आल्याचं समोर आले आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी याविषयी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालय यांना पत्र लिहून अशी माहिती देत योग्य ती कारवाई करण्याची विंनती केली आहे.

यावर बोलताना मोक्षदा पाटील म्हणाल्या की, "जिल्ह्यातील अनधिकृत पुतळ्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांना देण्यात आली आहे. तसेच अनधिकृत पुतळे जेव्हा तलाठी किंवा तहसीलदार काढण्यासाठी जातील तेव्हा त्यांना पोलीस बंदोबस्त दिला जाईल. आम्ही याप्रकरणी गुन्हे सुद्धा दाखल केले आहेत. पण तरुणांनी पुतळे उभारण्यापेक्षा वाचनालय उभारावे" असं मोक्षदा पाटील यांनी म्हटलं आहे.

Updated : 30 Oct 2020 11:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top