Home > News > 'पप्पा मला माफ करा' म्हणत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

'पप्पा मला माफ करा' म्हणत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

पप्पा मला माफ करा म्हणत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
X

औरंगाबाद: 'माझ्या मरणाला कोणालाही दोष देऊ नका, पप्पा मला माफ करा' अशी चिठ्ठी लिहून तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड गावात रात्रीच्या सुमारास घडली.

गावातील शिवाजीनगर भागात राहणारी अंजली जाधव असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. आई-वडील बाहेर गेल्याने घरात कुणीच नव्हतं. त्यानंतर काही वेळेने अंजलीचे वडील काकासाहेब जाधव आणि त्यांची पत्नी घरात आल्यावर त्यांना मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

माहिती मिळताच स्थानिक पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहचले. तसेच पंचनामा करत पोलिसांना घटनास्थळी चिठ्ठी आढळून आली. ज्यात ' माझ्या मरणाला कुणालाही दोष देऊ नका,पप्पा मला माफ करा', असं लिहलेलं असल्याचं पोलिसांनी सांगितले.

Updated : 4 July 2021 6:55 AM GMT
Next Story
Share it
Top