Home > News > तुटलेले प्रेमसंबंध जुळवून घेण्याच्या नादात तरुणीने गमावले साडेचार लाख; बाबा बंगालीच्या अमिषाला बळी

तुटलेले प्रेमसंबंध जुळवून घेण्याच्या नादात तरुणीने गमावले साडेचार लाख; बाबा बंगालीच्या अमिषाला बळी

तुटलेले प्रेमसंबंध जुळवून घेण्याच्या नादात तरुणीने गमावले साडेचार लाख; बाबा बंगालीच्या अमिषाला बळी
X

मुंबई: तुटलेले प्रेमसंबंध जुळवून घेण्याच्या नादात एका तरुणीला साडेचार लाख गमवावे लागले आहे. खारघर येथील 26 वर्षीय तरुणीला प्रेमसंबंध तुटलेल्या मित्रासोबत पुन्हा लग्न करण्यासाठी वश करून देतो, असे सांगून एका बंगाली बाबाने या तरुणीची चार लाख 57 हजाराची फसवणूक केली आहे. खारघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पिडीत तरुणीचे एका मित्रासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. वर्षाभरापूर्वी त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटले. त्यामुळे ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. अशातच लोकलने प्रवास करत असताना तिला, एक जाहिरात पहायला मिळाली. ज्यात घरगुती अडचणी, प्रेमसंबंधातील अडचणी याच्या समस्या सोडवण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन केलेले होते.

त्यामुळे पिडीत तरुणीने, या नंबरवरील बाबा कबीर खान बंगाली मेरठ याच्याशी संपर्क केला. पुढे या बाबाने विविध कारण देत आणि आश्वासन देत पिडीत मुलीकडून टप्प्या-टप्याने जवळपास साडेचार लाख रुपये उकळले. मात्र आपली फसवणूक होत असल्याचं, लक्षात येताच या तरुणीने पोलिसात तक्रार दिली.

Updated : 7 July 2021 4:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top