Home > News > बोगस मतदान रोखण्यसाठी जागृत मतदार आवश्यक : रवींद्र आंबेकर

बोगस मतदान रोखण्यसाठी जागृत मतदार आवश्यक : रवींद्र आंबेकर

बोगस मतदान रोखण्यसाठी जागृत मतदार आवश्यक : रवींद्र आंबेकर
X

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या लोकशाही देशात कुठे ना कुठे निवडणुका सुरू असतात. पण अनेक ठिकाणी बोगस मतदान होत असते. पण मतदार जर जागृत असेल तर बोगस मतदान होऊ शकत नाही, असे मत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केले आहे. मुंबईतील चेंबूर विधानसभा मतदारसंघात मतदार दिनानिमित्त नव मतदारांना ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमामध्ये रवींद्र आंबेकर यांनी नवमतदारांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. नवमतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क निभावला पाहिजे आणि बोगस मतदान करणाऱ्यांना रोखले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी तरुण मतदारांना केले.

Updated : 25 Jan 2022 12:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top