Home > News > असे बोर्ड असतील तर चुकून स्त्रियांच्या स्वछतागृहात पुरुष घुसला तर काय होईल तुम्हीच सांगा..

असे बोर्ड असतील तर चुकून स्त्रियांच्या स्वछतागृहात पुरुष घुसला तर काय होईल तुम्हीच सांगा..

असे बोर्ड असतील तर चुकून स्त्रियांच्या स्वछतागृहात पुरुष घुसला तर काय होईल तुम्हीच सांगा..
X

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांमध्ये जाताना प्रत्येक जण एका ठिकाणी कायम गोंधळतो. आता तुमच्या मनात सुद्धा ती पाटी आली असेल. तर होय आम्ही त्या पाटीबाबतच बोलतो आहे. तुम्ही कुठेही सार्वजनिक ठिकाणी शौचालयाचा वावर करण्यासाठी जात असाल तर त्या ठिकाणी महिला व पुरुष असे दोन स्वछतागृहे असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पुरुषांचे वॉशरूम कोणत्या बाजूला आहे व स्त्रियांचे कोणत्या बाजूला आहे याचे फलक त्या ठिणकी लावलेले असतात. अनेक ठिकाणी त्यावर ठळक अक्षरात स्त्री व पुरुष असं लिहून बाण दाखवले असतात. पण आता अनेक ठिकाणी काहीतरी क्रीटीव्ह करण्याचा नादात असे काही सिम्बॉल काढलेले असतात की त्या ठिकाणी गेल्यावर विचार करावा लावतो की, बाबा यामध्ये पुरुषांचं व स्त्रियांचं वॉशरूम नक्की कोणत्या बाजूला आहे.

असाच एक अनुभव एका ट्विटर वापरकर्त्याला आला व त्याने त्या ठिकाणच्या फोटो काढून तो ट्विट केला. त्याने तो फोटो शेअर केला पण असाच अनुभव आलेले ते एकटेच नाहीत. कारण ट्विट केलेल्या फोटोवर अनेकांनी असे कित्येक शेअर करत आपले अनुभव सांगितले आहेत. आता ज्याने पहिला हा फोटो शेअर केला आहे त्यांनी काय म्हंटलं आहे पाहुयात, तर के या नावाने हे ट्विटर हान्डेल आहे. ते म्हणतायत की, "मागील दोन मिनिटांपासून मी नक्की कुठे जाऊ म्हणून गोंधळलेल्या अवस्थेत इथे उभी आहे. हे नक्की काय आहे.." असं म्हणत त्यांनी खालील फोटो शेअर केला आहे.

ट्

या ट्विटच्या खाली त्यांनी त्या ठिकाणी त्यांची झालेली फजिती सांगितली आहे."माझी मैत्रीण आधी उजवीकडे गेली आणि मग ती माझ्याबरोबर डावीकडे गेली. आम्हाला वाटते की डावीकडे महिलांसाठी आहे कारण उजव्याला रुंद खांदे आहेत आणि डाव्याने स्कर्ट घातलेला आहे. दोन्ही वॉशरूम आतून सारख्याच दिसत होते, त्यामुळे या उत्तराचा शोध अजून सुरूच आहे.

आता हे समजत नाही की सार्वजनिक ठिकाणी स्वछतागृहाबाहेर सरळ सरळ ठळक अक्षरात महिलांचे या बाजूला आहे व पुरुषांचे या बाजूला आहे अस का लिहिलं जात नाही? आता प्रत्येक ठिकाणी ही न समजणारी क्रिएटिव्हिटी कशाला हवी..

आता हा असा अनुभव घेतलेल्या या एकट्याच नाहीत. तर त्यांच्या या ट्विटला रिट्विट करत अनेकांनी आपले अनुभव शेअर केले आहेत. तर अनेकांनी असे स्वछतागृहाबाहेरील गोंधळात टाकणाऱ्या बोर्डचे फोटो शेअर केले आहेत. आता काय फोटो व प्रतिकिया आल्या आहेत पाहुयात..

प्लश मित्तल या ट्विटर वापर वापरकर्त्याने असाच एक गोंधळात टाकणारा फोटो शेअर केला आहे. आणि या फोटोला त्यांनी "मीरा रोडला हे आताच सापडलं" असं कॅप्शन दिला आहे.

ट्

शहाजी या ट्विटर वापरकर्त्याने सुद्धा असाच एक फोटो शेअर केला आहे. पण या फोटोमध्ये जो बोर्ड लावला आहे त्या बोर्ड वरती लिहिलेला मजकूर अत्यंत मजेशीर आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, "Men to the left because Women are always right"

ट्

तर अशाच प्रकारचा आणखीन एक फोटो शेअर करत एकाने म्हंटले आहे की, या मध्ये तुम्हाला काही समजत असेल तर कृपा करून सांगा..

आता देशमुख यांनी पुन्हा रिट्विट करत आपलं मत व्यक्त केला आहे त्या म्हणतात की, 'मला सुद्धा नुकताच असा एक अनुभव आला होता. या खूपच भयंकर डिझाईन आहेत. मला या स्वच्छतागृहांच्या बाहेर थोडा वेळ थांबावं लागलं आणि विचार करावा लागला."

आता आपण वरती जे काही सर्व ट्विट्स पाहिले ते एका अर्थाने तुम्ही मजेने पाहत असाल. पण यातला जर मजेचा भाग वगळला तर तुम्ही थोडी कल्पना करू शकता का? की समाज एखाद्या लेडीज बाथरूम मध्ये चुकून एखादा पुरुष गेला तर काय होईल? किंवा पुरुषांच्या बाथरूममध्ये चुकून महिला गेली तर किती गदारोळ होईल? आता चुकून असं काही झालं तर यामध्ये त्यात त्या पुरुषाला किंवा स्त्रीला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. कारण अशा प्रकारचे लोकांना संभ्रमीत करणारे, पाहताच क्षणी लक्षात न येणारे चिन्हे ही दिशादर्शक म्हणून लावल्यास आणखीन दुसरं काय होणार.

Updated : 12 May 2022 12:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top