Home > News > "हो आहे माझा दहशतवाद्यांशी संबंध", प्रियांका गांधी भडकल्या...

"हो आहे माझा दहशतवाद्यांशी संबंध", प्रियांका गांधी भडकल्या...

हो आहे माझा दहशतवाद्यांशी संबंध, प्रियांका गांधी भडकल्या...
X

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधींचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्या मध्ये त्या एका पत्रकाराला, "हो आहे माझा दहशतवाद्यांशी संबंध" असं सांगताना दिसत आहे. पण त्या असं का म्हणाल्या हेच आता आपण पाहणार आहोत.

सध्या उत्तरप्रदेशमध्ये निवडणूकीचे पडघम वाजले आहेत. चार टप्प्यांचं मतदान झालं असून तीन टप्प्यातील मतदान अजून व्हायचं आहे. प्रियांका गांधी या हॅलिकॉप्टमध्ये बसत असतानाच आज तक वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने स्मृती इराणींच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया मागितली. यावर प्रियांका गांधी अचानक भडकल्या आणि त्या म्हणाल्या, "हो आहेत माझे दहशतवाद्यांशी संबंध... माझ्या वडिलांना दहशतवाद्यांनी मारलंय, माझ्या आज्जीला दहशतवाद्यांनी मारलंय... पुन्हा असले वायफळ प्रश्न विचारू नका..."

नेमकं हा व्हिडीयो आचार्य प्रमोद यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट करत त्यांनी म्हटलंय, "मुँहतोड जवाब!"

Updated : 26 Feb 2022 12:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top