Home > News > खरा वारकरी विठ्ठलाला सोडत नाही : यशोमती ठाकुर

खरा वारकरी विठ्ठलाला सोडत नाही : यशोमती ठाकुर

खरा वारकरी विठ्ठलाला सोडत नाही : यशोमती ठाकुर
X

हल्ली बडव्यांमुळे विठ्ठलाला सोडलं असं बोलायची फॅशन आलीय पण खरा वारकरी काहीही झालं तरी विठ्ठलाला सोडत नाही. असे ट्विट यशोमती ठाकूर यांनी केलेले आहे. सध्याच्या राजकारणाला लागलेले वळण आणि कित्येक वर्ष पक्षासाठी निष्ठेने काम केलेले ज्येष्ठ नेते सुद्धा सत्तेसाठी पक्ष सोडत आहेत. असं चित्र असताना काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी हे ट्विट केलेले आहे.

"हल्ली बडव्यांमुळे विठ्ठलाला सोडलं असं बोलायची फॅशन आलीय. कळसाचं दर्शन घेऊन परत जाईल पण विठ्ठलाला अंतर देत नाही. सध्या विठ्ठलावरच वार करणारी नवी जमात जन्माला आलीय, या जमातीला सुबुद्धी येवो यासाठी मी थेट विठुमाऊलीला साकडं घालायला आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला चिखल दूर व्हावा आणि सर्वसामान्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी विठुमाऊली व आई रुख्मिनी च्या चरणी प्रार्थना केली."असे विधान यशोमती ठाकूर यांनी ट्विट द्वारे केलेले आहे.

"देशाला आणि राज्याला जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी काँग्रेसचं राज्य येवू दे असा आशिर्वाद ही विठुमाऊली व आई रुख्मिनी कडे मागितला..."यशोमती ठाकूर यांनी आशीर्वाद मागत राजकारणाची दुर्दशा थांबवण्यासाठी आपल्या पक्षाचं राज्य यावं हा आशीर्वाद मागितला आहे.

Updated : 12 July 2023 7:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top