Home > News > चक्रीवादळग्रस्त नागरिकांना यशोमती ठाकूर यांचा दिलासा

चक्रीवादळग्रस्त नागरिकांना यशोमती ठाकूर यांचा दिलासा

चक्रीवादळग्रस्त नागरिकांना यशोमती ठाकूर यांचा दिलासा
X

अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील वऱ्हा गावांमध्ये चक्रीवादळामुळे 61 घरांचे नुकसान झालं होतं आणि पडझड झाली होती. सोमवारी या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच पुढील कारवाई बाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यशोमती ठाकूर यांनी आपल्या मतदारसंघातील वऱ्हा या गावामध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला मदत करण्याचे निर्देश दिले. तसेच पंचनामे करून सानुग्रह अनुदान देण्याचेही निर्देश दिलेत. यावेळी नुकसानग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप करून मदतीचा हातही दिला.Updated : 12 July 2021 2:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top