Home > News > कुस्तीपटू विनेश फोगाट शिस्तभंग केल्यामुळे निलंबित

कुस्तीपटू विनेश फोगाट शिस्तभंग केल्यामुळे निलंबित

विनेश फोगाट यांना शिस्तभंग केल्या प्रकरणी अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे.

कुस्तीपटू विनेश फोगाट शिस्तभंग केल्यामुळे निलंबित
X

टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्यावर शिस्तभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाने आता विनेश फोगाट यांना तात्पुरते निलंबित केले आहे. या निलंबनामुळे त्यांना आता भारतीय संघातील इतर सदस्यांना प्रशिक्षण देता येणार नसून स्पोर्ट व्हिलेज मध्ये देखील राहण्यास मज्जाव केला आहे.

काय शिस्तभंग केला होता?

विनेश फोगाट हिने भारतीय संघाला शिवनरेश या कंपनीची स्पॉन्सरशिप असताना त्याजागी नायकी ब्रँडचे कपडे वापरले होते. त्यामुळे तिला या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. अशाप्रकारे वर्तणूक करणे हा शिस्तभंग असल्यामुळे तिला आता निलंबित केले आहे. जोपर्यंत या सर्व आरोपांचे बद्दल फेडरेशनला त्या योग्य उत्तर देत नाहीत तोवर त्या कोणत्याच प्रकारच्या कुस्ती स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीत.

भारतीय कुस्ती महासंघाने आता Vinesh Phogat यांना तात्पुरते निलंबित केले असून त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटिसला 16 ऑगस्ट पर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे

Updated : 11 Aug 2021 2:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top