Home > News > "या चिमण्यांनो ,परत फिरा" चिमण्या का नाहीश्या होत आहेत ?

"या चिमण्यांनो ,परत फिरा" चिमण्या का नाहीश्या होत आहेत ?

या चिमण्यांनो ,परत फिरा चिमण्या का नाहीश्या होत आहेत ?
X

चिमणी ... आपल्या लहानपणाच्या गाण्यांपासून ते आजीच्या गोष्टीपर्यंतची चिमणी ... आता नाहीशी होतेय ... लहानपणीचा घास पण चिऊ काऊचा असायचा ... पण हि चिऊ म्हणजे चिमणीच हल्ली दिसत नाही ...चिमण्यांची संख्या कमी झाल्याचं आपण ऐकतॊ... पण का ? आताच्या मुलांना मोबाईलवर सहज चिमण्या बघता येतात म्हणून ? याला बरीच कारण आहेत... २० मार्चला जागतिक चिमणी दिवस साजरा करतात ...आपली बालपणीची मैत्रीण हरवत चालीय ... तिला वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो ? का ती हरवत चालीय ?चला पाहूया ...


जागतिक चिमणी दिवस कोणी सुरु केला ?

"जागतिक स्पॅरो डे "हा भारतातील नेचर फॉरएव्हर सोसायटी (NFS) द्वारेआणि इको-सिस ऍक्शन फाउंडेशन (फ्रान्स) यांनी सुरु केला आहे . ज्याची सुरुवात २०१० मध्ये झाली ...

यंदाची जागतिक चिमणी दिवसाची थीम काय ?

यंदाच्या जागतिक चिमणी दिनाची थीम "I LOVE SPARROW " हि आहे .

चिमण्या का गेल्या ?

घरातील चिमण्या एकेकाळी जगभरातील शहरांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य पक्ष्यांच्या प्रजातींपैकी एक होत्या. तथापि, गेल्या 25 वर्षांत यापैकी अनेक शहरांमध्ये त्यांची लोकसंख्या झपाट्याने घटली आहे. याआधी माणसाच्या घरात चिमण्या घर करायच्या ... आता एयर कंडिशनर घरे आली... प्रदूषण आलं, खरेतर चिमण्याना माणसात राहायाला आवडतं ,घरात किंवा बाहेर धान्य पडलेले असले कि त्या चोचीत घेऊन चिमण्या आपल्या घरट्याकडे जायच्या ... आता फूड पॅकिंग आले , कीटकनाशके आली त्यामुळे कीटक नाहीत आणि कीटक नाहीत तर चिमण्या खाणार काय ? त्यामुळे चिमणीच दिसेनाशी झाली ... जरी चिमणी आकाराने लहान असली तरी इकोसिस्टम साठी महत्वाची आहे ... किड्याना खाऊन चिमणी पेस्ट कंट्रोलच काम करते .


पण १९५८ मध्ये चिमण्यांना चीनने मारले होते ... चीन नेहमीच सर्वश्रेष्ठ होण्याची स्वप्न पाहतो आणि त्यासाठी काहीही करायला तयार होतो... असच १९५८ मध्ये ४ किट अभियान सुरु केलं होत यामध्ये चिमण्या ,उंदीर ,माशी आणि डास यांना मारायचं ठरवलं ... चिमण्या वर्षाला लाखो टन धान्य खात असतील असं म्हणत चिमण्यांना मारलं पण काही काळातच चीनमध्ये भूकमारी आली ...

भारतात 2012 मध्ये, या प्रजातीचे जतन आणि जनजागृती करण्याच्या मोठ्या मोहिमेचा भाग म्हणून घरातील चिमणीला नवी दिल्लीचा राज्य पक्षी म्हणून घोषित करण्यात आले.आणि त्यासाठी गोरैया ग्राम येथे चिमण्यांच जतन केलं जात आहे ...

चिमणी लहान आहे पण जर नष्ट झाली तर प्रश्न मोठा निर्माण होऊ शकतो ... त्यामुळे चिमणीसाठी छोटी घरटी जरी नाही बनवता आली तर निदान धान्य आणि पाणी तर ठेवू शकतोच ,नाही का ? ...

Updated : 20 March 2023 1:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top