Home > News > "पर्यावरणावर प्रेम करा ,त्याला आलिंगन द्या "अमृता फडणवीसांचा संदेश

"पर्यावरणावर प्रेम करा ,त्याला आलिंगन द्या "अमृता फडणवीसांचा संदेश

पर्यावरणावर प्रेम करा ,त्याला आलिंगन द्या अमृता फडणवीसांचा संदेश
X


World Enviornment Day निमित्त अमृता फडणवीस यांनी त्यांचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ट्विटरला खास त्यांनी ट्विट केले आहे . निसर्ग प्रेम आणि निसर्गामुळे मानवाला मिळणारी शांतता काय असते ? हे प्रत्येकाला माहित आहे. पण अमृता फडणवीस यांनी World Enviornment Day विषय एक खास संदेश सुद्धा लिहिला आहे . त्या काय म्हणाल्या वाचा ...

"काही मानवनिर्मित जगात हरवून जातात तर काही निसर्गाच्या जंगलात स्वतःला शोधण्यासाठी भटकतात! पर्यावरणावर प्रेम करा, पर्यावरणाला आलिंगन द्या आणि स्वतःला शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी त्याचे संरक्षण करा!",असा संदेश अमृता फडणवीस यांनी दिला आहे.



अमृता फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असून त्या नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात . मनोरंजन क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही अमृता फडणवीस या काम करताना दिसतात .




त्यांच्या गाण्याचे अल्बम हे काही सेकंदातच व्हायरल होतात. मनोरंजन क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र अमृता फडणवीस यांचे पती जरी उपमुख्यमंत्री असले ,तरी अमृता फडणवीस यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे . ती ओळख तशीच जपायला त्यांना खूप आवडतं ,असं त्या नेहमी म्हणतात . World Enviornment Day चे ट्विट करत त्यांनी संदेश सुद्धा दिला आहे ,तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे प्रतिसादात कळवायला विसरू नका.

Updated : 5 Jun 2023 9:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top