Home > News > महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदेंची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारीपदी निवड...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदेंची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारीपदी निवड...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदेंची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारीपदी निवड...
X

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेस कात टाकताना दिसत आहे. गेल्या ६ वर्षात काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात झालेली पिछेहाट पाहाता कॉंग्रेस महाराष्ट्रात नाममात्र उरलीये असं वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली होती.

मात्र २०१९ ला महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेसला महाराष्ट्रात पुन्हा अच्छे दिन यायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात आलेली मरगळ झटकण्यासाठी हायकमांड जोरदार प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. त्याच दृष्टीकोनातून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या वर्षभरात अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

अलीकडेच काँग्रेस हायकामांडने मुंबईच्या अध्यक्षपदी भाई जगताप, कार्याध्यक्षपदी चरण सिंग सप्रा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी संध्याताई सव्वालाखे यांची नियुक्ती केल्यानंतर आता काँग्रेस हायकामांडने काँग्रेस पक्षाच्या तरुण आमदार प्रणिती शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. प्रणिती शिंदे यांच्यावर अगोदरच महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी आहे.

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीमध्ये करण्यात आलेले बदल पाहता, आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून काँग्रेस राज्यात तरुण नेत्यांवर जबाबदारी देत असल्याचं चित्र आहे.

Updated : 23 Feb 2021 3:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top