Home > News > ठाण्यात होणार वाहतूककोंडी ; ४ फेब्रुवारीपासून १५७ रस्त्यांचे काम होणार सुरू

ठाण्यात होणार वाहतूककोंडी ; ४ फेब्रुवारीपासून १५७ रस्त्यांचे काम होणार सुरू

ठाण्यात होणार वाहतूककोंडी ; ४ फेब्रुवारीपासून १५७ रस्त्यांचे काम होणार सुरू
X

ठाणे परिवहन सेवेत नवीन येणाऱ्या इलेक्ट्रिक बसची ठाणेकरांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे .येत्या 26 जानेवारी रोजी पहिल्या दोन बस ठाणेकरांना सेवेत दाखल होणार आहेत. त्यानंतर फेब्रुवारी अखेरपर्यंत एक एकूण 123 बस सेवेत दाखल होणार आहेत. आचारसंहिता संपल्यावर सीएनजीच्या 20 बस दोन टप्प्यात दाखल होणार असल्याची माहिती परिवहन सूत्रांनी दिली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केंद्राने उचललेल्या पावलानुसार ठाणे महापालिकेत 123 इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी 58 कोटी 10 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. टप्प्याटप्प्याने या बस ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्याचा परिवहन चा मानस आहे.

जानेवारी महिन्यात अखेरीस 32 बस परिवहनच्या सेवेत दाखल होणार आहेत .सध्या ठाणे महापालिका क्षेत्रात विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता लागू आहे. ठाणे महापालिकेत उशिरा कामावर येणाऱ्या चाळीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काही उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एक ते दोन रजा रद्द करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे .महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मागील महिन्यात महापालिकेच्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांना आय स्कॅनिंग ने हजेरी सुरू केली होती. काही कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक आयने हजेरी लावण्यासाठी प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर महापालिका प्रशासन एक कारवाईचा बडगा उगारताच कर्मचाऱ्यांनी स्कॅनिंग करून हजेरी लावणं सुरुवात केली होती .तरी देखील मागील महिन्यात 127 कर्मचारी महापालिकेत वेळेवर कामावर येत नसल्याचे आढळून आले. त्यापैकी 40 कर्मचारी सात दिवसांपेक्षा जास्त वेळा कामावर उशिरा आले आहेत .त्यांना सतत उशिरा कामावर आल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली असून ,कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दोन पेक्षा जास्त वेळा कामावर उशिरा येणारे तीन पेक्षा जास्त वेळा उशिरा येणाऱ्यांच्या अनुक्रमे एक आणि दोन रजा कमी करण्यात आल्या आहेत. ठाणे शहरात 4 फेब्रुवारी पासून एकाच वेळी 157 रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. एकाच वेळी ही कामे सुरू झाल्यास वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे .मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या मोहिमे अंतर्गत शहरातील रस्त्यांची कामे महापालीकेने युद्ध पातळीवर हाती घेतली आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 214 कोटींची 127 रस्त्यांची कामे महापालिकेने हाती घेतली आहेत .त्यातील बहुतेक कामे आता टप्प्यात आली असून ती लवकरच पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस आहे . त्यात दुसऱ्या टप्प्यात असलेल्या 391 कोटीच्या माध्यमातून महापालिकेने पुन्हा 157 रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत.

Updated : 24 Jan 2023 10:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top