महिला आयोगाची वारकरी महिलांसाठी सेवा
X
विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या महिला वारकऱ्यांची सेवा महिला आयोग करते आहे.आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना त्रास होणार नाही त्यांना चांगल्या प्रकाराच्या आरोग्यविषयक सोई सुविधा मिळाव्यात याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वारकरी महिलांना सॅनिटरी नॅपकिन,बालकांना स्तनपानाकरिता हिरकणी कक्ष, न्हाणीघर, शौचालय स्वच्छतागृह, दामिनीपथक,प्राथमिक उपचार,रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच या उपक्रमाअंतर्गत तिन्ही जिल्ह्यात १९८ हिरकणी कक्ष, ३० हजार ९८८ शौचालय, ३ हजार ४५४ न्हाणीघर, २२३ वैद्यकीय पथक, ३१७ रुग्णवाहिका, १८९ आरोग्यदूत, २२६ स्थानिक उपचार केंद्र, १२ उपजिल्हा रुग्णालय आणि ४६६ उपकेंद्राचा समावेश आहे. तसेच महिलांना सॅनिटरी नॅपकिन, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन आदी सुविधा प्रत्येक १० ते १२ किलोमीटर अंतरावर केल्या आहेत.
तसेच या सर्व सुविधा कुठे मिळतील हे शोधण्यासाठी ॲपही उपलब्ध करुन दिले आहे.
या वारी सुविधा ॲपच्या माध्यमातून महिला वारकरी भक्तांना स्वच्छतागृह , हिरकणी कक्ष आणि सॅनेटरी नॅपकिन स्टॉल कुठे आहेत? याची सहज माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे ॲप वारकरी महिला भक्तांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.