Home > News > महिला शक्ती हीच पक्षाची खरी ताकद - प्रसाद लाड

महिला शक्ती हीच पक्षाची खरी ताकद - प्रसाद लाड

महिला शक्ती हीच पक्षाची खरी ताकद - प्रसाद लाड
X

मुंबई भाजपा महिला मोर्चा कार्यकारणीची बैठक आज पार पडली. पार पडलेल्या या कार्यकारणी बैठकीस भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांची संख्या पाहून लाड यांनी सर्वांचे कौतुक करत महिला शक्ती पक्षाची खरी ताकद आहे. हीच ताकद भाजपची महिला शक्ती संघटनेच्या माध्यमातून दिसून आल्याचे म्हंटले आहे.

प्रसाद लाड हे आज मुंबई भाजपा महिला मोर्चा कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित राहिले होते. या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळचे फोटो देखील त्यांनी समाज माध्यमांवर शेअर केले आहेत.






या बैठकीस सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या डोक्यावर फेटा घालून सहभागी झाल्या होत्या. प्रसाद लाड हे विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई भाजप महिला पदाधिकाऱ्यांशी बोलत होते. यावेळी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी लाड यांचे स्वागत विद्धल-रुक्मिणी मूर्ती देऊन केले.





पार पडलेल्या या बैठकीनंतर प्रसाद लाड यांनी ट्विट करत महिला शक्ती हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे म्हंटले आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, भाजप मुंबईच्या महिला मोर्चा कार्यकारिणी बैठकीस उपस्थित राहून सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपची महिला शक्ती संघटनेच्या माध्यमातून दिसून आली. हीच महिला शक्ती पक्षाची खरी ताकद आहे.

Updated : 22 July 2022 3:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top