Home > News > संजय राठोड यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शानावरून मॅक्स वूमनवर महिला नेत्यांमध्ये जुंपली..

संजय राठोड यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शानावरून मॅक्स वूमनवर महिला नेत्यांमध्ये जुंपली..

संजय राठोड यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शानावरून मॅक्स वूमनवर महिला नेत्यांमध्ये जुंपली..
X

मंगळवारी सायंकाळी मॅक्स वूमनवर पूजा चव्हाण प्रकरणी चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चेत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी आमदार विद्याताई चव्हाण, भापच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव, मनसेच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या सहभागी झाल्या होत्या.

संजय राठोड यांनी आज यवतमाळ मध्ये शक्ती प्रदर्शन करत पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलीसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय, त्याच बरोबर पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर आज माध्यमांसमोर आलेले संजय राठोड गेले १० दिवल कुठे होते? हाव प्रश्न देखील विचारला जातोय. चर्चे दरम्यान या सर्वांना हेच प्रश्न विचारण्यात आले.

यावर या महिला नेत्यांमध्ये आपआपसात जुंपली तृप्ती देसाई यांनी गुन्हेगाराला फाशी देण्याची मागणी करताच, मनसेच्या रूपाली पाटील यांनी तृप्ती देसाईंच्या कायद्या बद्दल त्यांना असलेल्या ज्ञानाबद्दल शंका उपस्थित करत त्यांच्यावर वैयक्तीक आरोप केले. तसेच दुसरीकडे विद्या चव्हाण यांनी संजय राठोड प्रकणाला सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाशी जोडत अर्णब आणि रिपब्लिकच्या वादावर बोट ठेवलं तसेच भाजप अन्वय नाईक प्रकणाच्या चौकशीला का घाबरत आहे असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या प्रेरणा होनराव यांनी महाविकास आघाडीतल्या आणि खासकरून राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख यांच्या प्रकरणाशी जोडत विद्या चव्हाण यांना फैलावर घेतलं.

या चर्चे दरम्यान वातावरण इतकं तापलं की या महिलांनी नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक आरोप करायला सुरूवाच केली. दरम्यान या सगळ्या चर्चेत पूजा चव्हाणला न्याय मिळावा की नाही यावर चर्चा करण्यापेक्षा या महिला नेत्यांना एकमेकांची उणीधुणी काढण्यातच जास्त रस असल्याचं दिसून आलं.


Updated : 23 Feb 2021 8:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top