Home > News > त्याने तिच्यावर वार केला,पण लोक फक्त बघत राहिले

त्याने तिच्यावर वार केला,पण लोक फक्त बघत राहिले

त्याने तिच्यावर वार केला,पण लोक फक्त बघत राहिले
X


नाशिकमधील पाथर्डी गावाजवळ पेट्रोल पंपावर एका महिलेवर भर दिवसा इसमाकडून वार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.या हल्ल्यात सदर महिला ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत .

भर दिवसा आज नाशिकच्या पाथर्डी गाव - वडनेर रोड येथील जाधव पेट्रोलियम पंप वर काम करणाऱ्या महिलेवर एका इसमाकडून कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयित प्रमोद गोसावी असे हल्ला करणाऱ्या इसमाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.दरम्यान जखमी महिलेवर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात अधिक उपचार सुरू असून या हल्ल्यात सदर महिला ही गंभीर जखमी झाली आहे.भर दिवसा पेट्रोल पंपावर झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती.या हल्ल्याचा सर्व प्रकार येथील cctv मध्ये कैद झाला आहे.इंदिरानगर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे घटना स्थळी दाखल झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Updated : 25 Aug 2022 10:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top