Home > News > आजपासून एसटीच्या तिकिटात ५० % सूट ,महिला खुश ...

आजपासून एसटीच्या तिकिटात ५० % सूट ,महिला खुश ...

आजपासून एसटीच्या तिकिटात ५० % सूट ,महिला खुश ...
X


शिंदे फडणवीस सरकारने पहिला अर्थसंकल्प नुकताच सादर केला.या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी एसटी बस प्रवासात तिकीटामध्ये सरसकट 50% सुट दिल्याची घोषणा केली होती. यायाआधीही महिलांसाठी अनेक घोषणा देण्यात आल्या पण जशी चर्चा या योजनेची होत आहे तशी याआधी झाली नाही .

घोषणेची अंमलबजावणी आजपासून संपूर्ण राज्यात होत असल्याने महिला वर्ग आता मोठ्या प्रमाणावर बसने प्रवास करताना दिसत आहेत . सर्वसामान्य गरीब कुटुंबातील महिला आता 50% तिकीट दराने प्रवास करणार असल्याने एसटी बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर आता महिला दिसत आहे. ज्या महिलांना कुठल्याही कार्यक्रमाला अथवा बाहेर पडता येत नव्हतं. बस स्थानकात बसची वाट पाहताना महिला वर्ग मोठ्या संख्येत दिसत आहे. अशा सर्व महिला बसने प्रवास करताना दिसत आहेत. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे महिला वर्गाकडून स्वागत केले जात आहे. शासनाने नेहमी महिलांसाठी अशाच चांगल्या घोषणा कराव्यात, असे काही महिलांनी मत व्यक्त केलेले आहे.

यावर्षीच्या बजेटमध्ये महिलांसाठी अनेक योजना आहेत. लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलगी १८ वर्षाची झाली कि तिला ७५००० रुपये मिळणार आहेत .आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. नोकरदार महिलांसाठी शहरात ५० शासकीय वसतिगृह होणार आहेत .महिलांसाठी एसटी बसच्या प्रवासात तिकिटावर ५०%सूटही मिळणार आहे . जी आजपासून राज्यात लागू झाली आहे.

Updated : 17 March 2023 10:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top