Home > News > केरळात कोरोना विरोधात आता महिला पोलीसांचे 'बुलेट पेट्रोलिंग युनिट'

केरळात कोरोना विरोधात आता महिला पोलीसांचे 'बुलेट पेट्रोलिंग युनिट'

केरळात कोरोना विरोधात आता महिला पोलीसांचे बुलेट पेट्रोलिंग युनिट
X

‘केरळच्या त्रिशूरमधील यशानंतर लवकरच महिला अधिकाऱ्यांचे COVID-19 दुचाकी-पेट्रोलिंग युनिट्स राज्यभरात तैनात केलं जाइल, असं केरळचे पोलिस महासंचालक लोकनाथ बेहरा (Lokanath Behera) यांनी सांगितले आहे. कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगीतलं. ‘लॉकडाउनचे नियम न पाळणाऱे आणि सोशल डिस्टंसींगचे पालन न करणऱ्यांवर कारवाइ करण्याचे काम हे पथक करेल” असंही बेहरा यांनी म्हटलं आहे.

या महिला पथकाला केरळमधील त्रुशूर येथे प्रशिक्षण देण्यात आलं असुन शहरात गस्त घालण्याचं काम हे पथक करेल. ‘सुरुवातीपासूनच COVID विरोधात लढा देण्यास अग्रणी असलेल्या राज्यातील महिला अधिकाऱ्यांच्या यशाच्या दराचे मूल्यांकन केल्यावर हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे, असेही बेहेरा यांनी नमूद केले. सुरुवातीला, त्रिशूर शहरातील सुरक्षा सुनिश्चीत करण्यासाठी बाईकवर महिला अधिकाऱ्यांची कल्पना ही केवळ एक प्रयोग होता, परंतु बेहरा यांच्या मते, महिला पथक तैनात केल्याने मोठा परिणाम झाला आहे. या महिला अधिकारी स्वत:चे काम चेखपणे करत आहेत. तसेच क्वॉरंटाईन केलेल्या लोकांची विचारपूस आणि त्यांना काय हवं काय नको हे देखील त्या बघत आहेत.’ त्यामुळेच राज्यात या पथकाची संख्या वाढवण्यात येणार असल्याचं लोकनाथ बेहरा यांनी सांगतलं.

दरम्यान यापूर्वी मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले होते, तेव्हा महिला अधिकाऱ्यांना कलर-कोड हेल्मेटमध्ये नियमांची अंमलबजावणी करताना आणि ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांना मदत करताना पाहिले गेले होते. या पथकाने शहराच्या बाहेरील प्रवासी कामगारांच्या छावण्यांनाही भेट दिली होती.

Updated : 6 July 2020 2:48 AM GMT
Next Story
Share it
Top