Home > News > अवैध दारू बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस ठाण्याला घेराव...

अवैध दारू बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस ठाण्याला घेराव...

विषारी दारूमुळे गावातील आठ ते दहा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अवैध दारू बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस ठाण्याला घेराव...
X

नांदेड: जिल्ह्यातील किनवट आदिवासी बहुल भागातील गोंडे महागाव येथे रसायन मिश्रीत हात भट्टी व अवैध देशी दारू बंद करा या मागणीसाठी संतप्त झालेल्या महिलांनी इस्लापूर पोलीस ठाण्याला घेराव घालत दारू बंदीची मागणी केली. यावेळी काही काळासाठी गोंधळ उडाला होता.

किनवट तालुक्यातील गोंडे महागाव येथे दहा ते पंधरा रसायनमिश्रीत हात भट्टीद्वारे विषारी गावठी दारू काढून गावांमध्ये खुलेआम विकण्यात येते. धक्कादायक म्हणजे या विषारी दारूमुळे गावातील आठ ते दहा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच गावातील तरुण आणि शिक्षण घेणारे अनेक विध्यार्थी सुद्धा दारूच्या आहारी जात आहे.



याच अवैध दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाली आहे. विशेष म्हणजे शेजारील राज्यातून सुद्धा चोरट्या मार्गाने गावात दारू विक्री साठी आणण्यात येत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. त्यामुळे संतप झालेल्या गावातील महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरत, अवैध दारू बंद करण्याची मागणी केली.




Updated : 29 Jun 2021 7:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top