Home > News > नवऱ्यावरच्या रागामुळे महिलेने केली स्वतःच्याच ५ मुलांची हत्या....

नवऱ्यावरच्या रागामुळे महिलेने केली स्वतःच्याच ५ मुलांची हत्या....

नवऱ्यावरच्या रागामुळे महिलेने केली स्वतःच्याच ५ मुलांची हत्या....
X

जर्मनी (Germany) मध्ये एका महिलेने स्वतःच्याच पाच मुलांची हत्या केल्याची घटना (Mother Killed Her Kids) घडली आहे. ही महिला तिच्या नवऱ्याच्या दुसऱ्या महिलेसोबतच्या अफेअरमुळे (Husband Affair) नाराज होती. मुलांना मारण्याआधी तिने तिच्या नवऱ्याला तो मुलांना यापुढे पाहू शकणार नाही असा मेसेज पाठवला होता. या प्रकरणी कोर्टाने महिलेला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

माध्यमांनूसार, दुसऱ्या महिलेसोबत आपल्या नवऱ्याचा फोटो पाहिल्यावर २८ वर्षीय क्रिस्टीयनला राग अनावर झाला. तिने ३ सप्टेंबर २०२० ला जर्मनीच्या सोलिंगन येथे आपल्या ५ मुलांचा गळा दाबून तिने हत्या केली. तिला एकूण ६ मुलं होती.

कोर्टात दिलेल्या माहितानूसार सर्व मुलांचं वय ११ वर्षांखालील होतं. मृत्यपुर्वी सर्व मुलांना गुंगीचे औषध खाऊ घातलं गेलं होतं. ज्यावेळी क्रिस्टीयनने या मुलांची हत्या केली त्यावेळी तिचा सर्वात मोठा मुलगा घरात नव्हता, ज्याचं वय ११ वर्षे आहे, त्यामुळे तो वाचला.

स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न

मुलांची हत्या केल्यानंतर क्रिस्टायनने आत्महत्या करण्यासाठी डसेलडोर्फ सेंट्रल स्टेशन वर ट्रेनसमोर उडी मारली. परंतू तिचा प्रयत्न फसला आणि ती वाचली. शोधपथकाने कोर्टात खुलासा केला की क्रिस्टीयनने तिच्या नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत फोटो पाहिले होते. त्या दोघांचं अफेअर असल्याचा तिला संशय होता.

कोर्टाने दिली शिक्षा

कोर्टाने क्रिस्टीयनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात कोर्टाने ४० पेक्षाही जास्त साक्षीदारांची साक्ष ऐकली. या घटनेतून बचावलेल्या मुलाला कोर्टाने त्याच्य़ा आजीकडे सोपवण्याचे आदेश पोलीसांना दिले.

Updated : 5 Nov 2021 6:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top