Home > News > महिलेवर कुत्र्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा आरोप; होऊ शकते शिक्षा!

महिलेवर कुत्र्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा आरोप; होऊ शकते शिक्षा!

महिलेवर कुत्र्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा आरोप; होऊ शकते शिक्षा!
X

आयर्लंडमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका 29 वर्षीय महिलेवर कुत्र्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा आणि अनैसर्गिक संभोग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात, न्यायालयात सुनावणी झाली, ज्यामध्ये सरकारी वकिलाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की त्यांनी महिलेच्या विरोधात पुरावे गोळा केले आहेत.

द सन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, महिलेने डिसेंबर 2019 मध्ये तिच्या घरी मिश्र जातीच्या कुत्र्याशी (Rottweiler Dog) अनैसर्गिक संभोग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तिच्याविरोधात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 3 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायाधीशांना सांगितले की, त्यांनी आरोपी महिलेविरोधात पुरावे गोळा केले आहेत. ते न्यायालयात सादर करण्यास तयार आहे. त्याचवेळी महिलेच्या वकिलाने न्यायालयाकडे सदर महिला उपस्थित नसल्याने अधिक वेळ मागितला आहे.

त्यानंतर न्यायाधीशांनी या खटल्याच्या सुनावणीला महिन्याच्या अखेरपर्यंत स्थगिती दिली. तसेच आरोप असलेल्या महिलेला पुढील सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले. आरोपी महिलेच्या विरोधात सरकारी वकिलांकडून पुढील सुनावणीत पुरावे सादर केले जातील. तसेच, हे प्रकरण उच्च न्यायालयात सुद्धा सादर केले जाऊ शकते.

Updated : 5 Sep 2021 2:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top