Home > News > भाजप सरकार कंगना राणावत विरुद्ध गुन्हा दाखल करणार का ? - शर्मिला येवले

भाजप सरकार कंगना राणावत विरुद्ध गुन्हा दाखल करणार का ? - शर्मिला येवले

भाजप सरकार कंगना राणावत विरुद्ध गुन्हा दाखल करणार का ? - शर्मिला येवले
X

99 वर्षांसाठी देश भाडेतत्वावर दिलाय अस म्हणणारी भाजपची प्रवक्ता रुची पाठक आणि आता त्यानंतर 1947 ची आझादी म्हणजे भीक अस म्हणणारी कंगना राणावत (Kangana Ranaut) यांनी भारताबद्दल गरळ ओकणाऱ्यांना पद्म पुरस्कार दिला जातो यापेक्षा दुर्दैव ते काय असणार. बेताल बोलायचं वाईट बोलायचं ही तर भाजपची (BJP) प्रवृत्तीच आहे आणि भारताला नाव ठेवून भाजपचा रेटा लावायचा. भाजपचा उदोउदो करायचा हीच यांची रुची असुन कंगना यासारख्या लोकांचं काम आणि अशा लोकांना भाजपने पद्म पुरस्कार सुरू केलाय. वाहरे भाजपा सरकार वाह अस म्हणत महाराष्ट्र राज्य युवासेना सहसचिव शर्मिला येवले यांनी भाजपा सरकारवर टीका केली.

यापुढे बोलताना त्यांना, मोदी सरकार म्हणजे ढोंगी सरकार आहे, देशद्रोही सरकार आहे मला मोदी सरकारला ( Modi Government) प्रश्न विचारायचा आहे देशाविरुद्ध बोलल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो मग आता या बाईवर गुन्हा दाखल केला जाणार आहे का? याचे उत्तर भाजप सरकारने द्याव .की या व्यक्तीला आणखी कोणता सन्मान देऊन देशावासियांना मान खाली घालायला लावणाऱ्या आहात. असा शर्मिला येवले प्रश्न उपस्थीत केला आहे.

Updated : 12 Nov 2021 2:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top