Home > News > "उत्तर सभेसाठी राज ठाकरे पुन्हा एकदा 9 एप्रिलला ठाण्यात.." - शालिनी ठाकरे

"उत्तर सभेसाठी राज ठाकरे पुन्हा एकदा 9 एप्रिलला ठाण्यात.." - शालिनी ठाकरे

"मी धर्माध नाही ,मी धर्माभिमानी आहे या वाक्याचा अर्थच ज्यांना कळला नाही आणि म्हणे आम्ही हिंदुत्वाचे कैवारी......हिंदुत्वाची व्याख्या समजून सांगायला उत्तर सभेसाठी पुन्हा एकदा ९ एप्रिल ठाण्यात....!! मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांचे ट्विट..

उत्तर सभेसाठी राज ठाकरे पुन्हा एकदा 9 एप्रिलला ठाण्यात.. - शालिनी ठाकरे
X

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackrey) यांनी गुढीपाडव्यादिवशी शिवतिर्थावर जाहिर सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर जाहिरपणे टिका केली. या सभेनंतर राज ठाकरेंवर भाजपचा स्पीकर तसेच राज ठाकरे जातीय तेढ निर्माण करत असल्याची टिका झाली. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली त्यावरून मनसे आणि भाजप यांची युती होईल अशी चर्चा सुद्धा जोरात सुरू आहे.

गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी "ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावा, असं म्हटलं आणि त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा वाचण्याचे कार्यक्रम घेतले. या सगळ्या घटना घडल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अनेकांनी राज ठाकरे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली जात आहे.

राज ठाकरेंवर टीका होत असताना आता पुन्हा एकदा राज ठाकरे सभा घेणार आहेत.

या सर्व टिकेल राज ठाकरे 9 तारखेला उत्तर देणार..

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत "मी धर्माध नाही ,मी धर्माभिमानी आहे या वाक्याचा अर्थच ज्यांना कळला नाही आणि म्हणे आम्ही हिंदुत्वाचे कैवारी......हिंदुत्वाची व्याख्या समजून सांगायला उत्तर सभेसाठी पुन्हा एकदा ९ एप्रिल ठाण्यात....!!असं म्हटल आहे.

अनेक मनसे सैनिकांनी 9 तारखेला उत्तर सभा अस म्हणत समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यामुळे आता 9 तारखेला राज ठाकरे काय बोलणार याची अनेकांसोबत सर्व मनसे सैनिकांना आतुरता लागली आहे.

Updated : 2022-04-06T17:36:15+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top