Home > News > कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या नावावर दोन दिवसात एफडीत पैसे जमा करणार; विभागीय उपायुक्त महिला व बालविकासधिकारी

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या नावावर दोन दिवसात एफडीत पैसे जमा करणार; विभागीय उपायुक्त महिला व बालविकासधिकारी

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या नावावर दोन दिवसात एफडीत पैसे जमा करणार; विभागीय उपायुक्त महिला व बालविकासधिकारी
X

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनामुळे अनाथ झालेल्या वीस अनाथ बालकांच्या नावावर दोन दिवसात रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागीय उपयुक्त यांनी दिली. आज भाजपाचे माजी बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी अनाथ बालकांची जुबली पार्क येथील कार्यालयात भेट दिली, कोरोनाच्या संसर्गाने अनाथ झालेल्या बालकांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली,

अनेक दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गाने अनाथ झालेल्या बालकांच्या प्रश्नासंदर्भात शासन काहीही निर्णय घेत नव्हते, त्या अनुषंगाने आज माजी बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास यांच्याशी संपर्क साधून सदरील प्रकरणात संदर्भात विचारणा केली यावेळी दोन दिवसात सदरील अनाथ बालकांच्या नावावर पडीत पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय उपायुक्त महिला व बालविकासधिकारी यांनी दिली.

Updated : 8 Oct 2021 9:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top