Home > News > देशाच्या बेटीची व्याख्या भाजपाच ठरवणार का...?

देशाच्या बेटीची व्याख्या भाजपाच ठरवणार का...?

देशाच्या बेटीची व्याख्या भाजपाच ठरवणार का...?
X

तुम्हाला 'मंडी' Mandi म्हणजे काय हे माहीत आहे का ? मंडी कुठे असते आणि मंडी मध्ये लोक काय करतात असं कोणी मला विचारलं तर माझं उत्तर 'मंडी' ही एक बाजारपेठ आहे जिथून आपण अनेक वस्तू खरेदी करतो. मंडी हे हिमाचल प्रदेशातील एक सुंदर शहर आहे. 'मंडी' ही हिमाचलची लोकसभेची जागा आहे. असं माझं उत्तर असेल पण 'मंडी' हा शब्द अशा व्यवसायासाठी देखील वापरला जातो ज्याचे नाव घेणे लोक टाळतात, अशा परिस्थितीत, होळीच्या दिवशी, 25 मार्च 2024 रोजी, काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते SupriyaShrinate यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम Instagram अकाउंटवरून बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या BJP मंडी लोकसभेची उमेदवार कंगना राणौत हीच्यावरील एक पोस्ट समोर आली आहे. त्यावरून गदारोळ झाला आहे. त्या पोस्टमध्ये 'मंडी' हा शब्द दुहेरी अर्थ असलेल्या शब्दाप्रमाणे वापरल्याने गोंधळ तर व्हायलाच हवा होता. पण कंगना आणि सुप्रिया यांच्यातील या शब्दयुद्धात उर्मिला मातोंडकर अॅक्ट्रेस कधी उतरल्या हे कळलेच नाही. काय आहे हे मंडी प्रकरण? उर्मिला मातोंडकर Urmila Matondkar यांची का होते चर्चा जाणून घेऊया !


हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रणौतच्या विरोधात काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते SupriyaShrinate यांच्या सोशल मीडिया हँडलवर केलेल्या टिप्पणीनंतर निर्माण झालेला वाद थांबता थांबत नाही. कंगना रणौत भाजप उमेदवार असल्याने राजकीय वादला तोंड फुटल आहे, काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सोमवारी एक वादग्रस्त पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये कंगना राणौतचा Kangana Ranaut फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहीलं होतं की, 'मंडीत म्हणजेच (बाजारात) सध्याचा दर काय आहे हे कोणी सांगू शकेल का?' या पोस्ट सोबत कंगनाचा फोटो पोस्ट करण्यात आल्याने वादाला तोंड फुटलं आहे. कारण, भाजपने कंगना राणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.त्यानंतर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांचे या प्रकरावर स्पष्टीकरण आले आणि त्यांनी सांगितले की इंस्टाग्राम अकाउंट त्यांचे आहे, परंतु पोस्ट कोणीतरी दुसऱ्यानेच केली आहे. दरम्यान, यावर कंगनानेही तिच्याच शैलीत उत्तर दिले. आणि तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे- "आपण आपल्या मुलींना बंधनातून मुक्त केले पाहिजे, आपण या सर्वातून बाहेर पडलो पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण लैंगिक कामगारांचं जीवन किंवा परिस्थितीला अत्याचार किंवा अपमान म्हणून वापरण्यापासून परावृत्त केले पाहिजे. प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र आहे.."

पण कंगनाच्या उत्तरानंतर काय झालं? काही वेळातच एका अभिनेत्रीची चर्चा सुरू झाली. ती अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर . प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र आहे. असं म्हणणारी कंगणा स्वात:च वादाच्या भोवऱ्यात सापडली. याचं कारण कंगनाने 2020 मध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ज्याचा व्हिडिओ सद्या सोशल मिडिया x वर ट्रेंड करत आहे. उर्मिला मातोंडकरला उमेदवारी मिळाल्यानंतर कंगनाने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्नस्टार आहे, तिला उमेदवारी मिळू शकते, तर मला का नाही, असं कंगना रणौतनं म्हटलं होतं.

या सगळ्या प्रकरणानंतर नेटकऱ्यांनी उर्मिला मातोंडकरला कंगना सॉफ्ट पॉर्नस्टार म्हणाली होती त्याची आठवण करुन देत, कंगनाच्या मुलाखतीचा तो अंश लोक एक्स या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत आहेत आणि तू उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणाली होतीस त्याचं काय? असा सवाल विचारत आहेत. #उर्मिलामातोंडकर हा हॅशटॅगही नेटकऱ्यांनी ट्रेंड केला आहे. मासूम, भूत, प्यार तुने क्या किया, पिंजर, एक हसीना थी हे चित्रपट उर्मिलाच्या सशक्त अभिनयाचा पुरावा आहेत असं झीनत नावाच्या एका युजरने म्हटलं आहे. कंगना तू उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणाली होतीस विसरलीस का? असाही प्रश्न एका युजरने विचारला आहे. जे आत्ता कंगनाबाबत पोस्ट केली म्हणून गळा काढत आहेत त्यांनी कंगनाचा उर्मिलाबाबतच्या वक्तव्याचा निषेध का केला नाही? असा देखील प्रश्न विचारला जात आहे. अनेक मिडिया चॅनल सोबत महिला व बालकल्याण मंत्रालय व भारतीय महिला आयोगाने भाजपची नवनिर्वाचित मंडी लोकसभेची उमेदवार कंगना रणौतच्या विरोधात झालेल्या टिप्पणीची चांगलीच दखल घेतली आहे. तर सिनियर अॅक्ट्रेस उर्मिला मातोडकरच्या मानसन्माना बद्दल मात्र ब्र देखील काढण्यात आलेल नाही. भाजप उमेदवार कंगना रणौत, भाजपा समर्थक मुली, महिला या देशाची बेटी होऊ शकतात पण उर्मीला मातोडकर सारख्या अॅक्ट्रेस देश की बेटी होऊ शकत नाहित का ? देशाच्या बेटीची व्याख्या भाजपाचं ठरवणार का हा मात्र प्रश्नचं ...

Updated : 26 March 2024 3:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top