Latest News
Home > News > अर्धनग्न पुरुषांचे फोटो का पाहावे;आम्हाला काही चॉइस आहे की नाही…वॅक्सीनेशनवरून महिलांचा प्रश्न!

अर्धनग्न पुरुषांचे फोटो का पाहावे;आम्हाला काही चॉइस आहे की नाही…वॅक्सीनेशनवरून महिलांचा प्रश्न!

अर्धनग्न पुरुषांचे फोटो का पाहावे;आम्हाला काही चॉइस आहे की नाही…वॅक्सीनेशनवरून महिलांचा प्रश्न!
X

कोरोना माहामारीच्या मोठ्या संकटावर अखेर वॅक्सीन मिळालं आहे. १८ जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशभरात कोरोना वॅक्सीनेशनचा ड्राय रन घेण्यात आला. त्यात तब्बल ४४ लाख आरोग्य कर्मचारी, सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यानंतर भारत बायोटेकच्या कोवेक्सीन आणि सिरमच्या कोविशिल्ड या कोरोना लसीचे डोस देशभरात वितरीत करण्यात येत आहे. मात्र कोरोनाची लस घेताना अनेकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही आहे.

कोरोनाच्या लसीचा लवकर प्रभाव पडावा यासाठी ही लस दंडावर दिली जाते. महिला आणि पुरुषांना दोघांनाही याच पद्धतीने लस देण्यात येत आहे. मात्र लस घेताना फोटो काढून तो सोशल मिडियावर टाकायचा एक वेगळाच क्रेझ सध्या लोकांमध्ये दिसतोय. यात विशेषतः अनेक पुरूष लस घेताना युद्ध मैदानात एखाद्या शुरवीराने युद्धात स्वतःला झोकून द्यावं तसे जाताना दिसत आहे.

कोरोनाची लस घेताना अनेक पुरूष शर्ट हाफ किंवा फुल बाह्यांचं असेल तरीही मुद्दाम ते अर्ध काढून आपले दंड आणि छाती दाखवतात. यात अनेक सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचा सामावेश आहे. हे सर्वजण अशा प्रकारचा फोटो तर काढतातच, पण तो स्वतःपुरता न ठेवता सोशल मिडियावर एखाद्या युद्धात मेडल मिळाल्या सारखा टाकतात.

यामुळे अनेक महिला यावर आक्षेप घेताना दिसत आहे. एखाद्या अभिनेत्याने शर्ट काढला तर ते निदान बघण्यासारखं असतं. मात्र या पुरूष मंडळींना साध्या हाताच्या बाह्यावर करून घेता येणारी लस अर्धनग्न होऊन घ्यायची गरजच काय असते हा प्रश्न महिला विचारत आहेत. कोणी काय पाहाव हा ज्याचा त्याचा भाग आहे. पण या अशा पुरूषांचे फोटो, नको तिथे ते पोस्ट करतात. जे फोटो सोशल मिडियावर अनेक महिलां पाहातात उगीचचं पाहावे लगतात.


ज्यांना लस घेताना फोटो टाकायचाच आहे, त्यांनी आपल्या हाताच्या बाह्यावर करून दंडावर लस घेऊन टाकावा. मात्र अर्धनग्न होऊन छातीवरचे केस, सुटलेलं पोट दाखवून हे कोणत्या हिरो सोबत स्वतःची तुलना करू पाहातात. असाही सवाल महिलांकडून विचारण्यात येतोय.

यावर आम्ही भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी 'कोरोनाची लस घ्यायला जाताना पुरूषांनी आपली अक्कल वापरून हाफ स्लीवस् असणारे शर्ट घालावे. किंवा फुल स्लीवस् जरी घातले तरी ते थोडे ढगळ घालावे जेणेकरून शर्ट अर्ध काढायची वेळ येणार नाही.' अशी प्रतिक्रीया दिली.

तर दुसरीकडे आम्ही डॉक्टर साधना पवार यांना आम्ही याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी 'मला यात काही वावगं वाटत नाही. लस घ्यायला जाताना अनेक पुरूष हे कामाला निघालेले असतात आणि त्यांच्या रोजच्या पेहेरावात असतात. आणि मेडिकल प्रोफेशन मध्ये आम्हाला यात काही आक्षेपार्ह वाटत नाही. अशी प्रतिक्रिया दिली.'

Updated : 9 Feb 2021 2:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top