मंत्रालयातील ही मीटिंग का आहे महत्त्वाची...
Team | 11 Jun 2025 8:51 PM IST
X
X
बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भाशय काढण्यासंदर्भातील खोटी व अर्धवट माहितीवरून उठलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, महिला ऊसतोड कामगारांच्या आरोग्याच्या मूलभूत समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आज मंत्रालयात आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये आरोग्य तपासणी, नोंदणी, मोफत उपचार व समुपदेशन यासंबंधी सध्याच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला तसेच भविष्यातील सुधारणा यावर चर्चा झाली. याआधी तयार करण्यात आलेल्या SOP च्या अंमलबजावणीबाबतही या बैठकीत चर्चा झाली.
Updated : 11 Jun 2025 8:51 PM IST
Tags: meeting beed marathi news
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire