Home > News > आज का साजरा केला जातो महिला सामानता दिवस...

आज का साजरा केला जातो महिला सामानता दिवस...

आज संपूर्ण जगभर महिला समानता दिवस साजरा केला जातो. काय आहे या दिवसाचे वैशिष्ट्य वाचा...

आज का साजरा केला जातो महिला सामानता दिवस...
X

आज जागतिक महिला समानता दिवस आहे. अमेरिकेत महिलांना 26 ऑगस्ट 1920 ला घटनेनुसार मतदानाचा अधिकार मिळाला. तो दिवस आज सर्वत्र जागतिक महिला समानता दिवस (women's Equality Day) म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेत महिलांच्या समानतेसाठी लढा दिलेल्या वकील बेल्ला अब्ज़ुग यांच्या प्रयत्नातून 1971 पासून 26 ऑगस्ट हा दिवस महिला सामानात दिवस म्हणून साजरा केला जातो.

अमेरिकेतील महिलांनी आपल्या हक्कासाठी फार मोठा लढा उभा केला होता. महिलांना अमेरिकेत पुरुषांपेक्षा दुय्यम दर्जा दिला जात होता. अनेक वर्ष इथल्या महिलांना त्यांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढा द्यावा लागला. अमेरिकेत त्यावेळी मतदानाचा अधिकार (Right to vote) हा फक्त काही ठराविक पैसेवाल्या लोकांना होता. याविरोधात तिथल्या अनेक महिला पेटून उठल्या आणि या विरोधात त्यांनी एक लढा उभा केला.

सेनेका फॉल्स यांच्या नेतृत्वात न्यूयॉर्क या ठिकाणी महिलांच्या स्वातंत्र्य व समानतेसाठी लढा देण्यासाठी एक गट तयार केला होता. या चळवळीने महिलांच्या समानतेसाठी अनेक प्रयत्न केले. विशेष म्हणजे या चळवळीत पुरुष देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होते. आशा अनेक प्रयत्नांनी या चळवळीला अखेर 1920 ला यश आले आणि तिथल्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

Updated : 26 Aug 2021 7:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top