Home > News > आई वडिलांनी रागावल्यावर मुलं घर सोडून जाण्याचा निर्णय का घेतात...?

आई वडिलांनी रागावल्यावर मुलं घर सोडून जाण्याचा निर्णय का घेतात...?

आई वडिलांनी रागावल्यावर मुलं घर सोडून जाण्याचा निर्णय का घेतात...?
X

महाराष्ट्रातील एका १७ वर्षीय युट्युब स्टारला तिच्या पालकांनी रागावले याचा त्या मुलीला इतका तिरस्कार वाटला की ती घरातून पळून गेली आणि त्यानंतर काय काय घडलं आपण सर्वानी पाहिलं. तर झालं असं होत की, प्रत्यक्षात मुलगी घरी सापडत नाही हे समजल्यानंतर वडिलांनी मुलीच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आणि तिला शोधण्यासाठी पोलिस आणि जनतेची मदत मागितली. तक्रारीनंतर औरंगाबाद पोलीस आणि जीआरपीने किशोरीचा शोध सुरू केला.

युट्युबर मुलगी कुशीनगर एक्स्प्रेसने जात होती, त्याच दरम्यान जीआरपीने तिला इटारसी येथे ट्रेनमधून उतरवले आणि औरंगाबाद पोलिसांसह कुटुंबीयांना माहिती दिली. शनिवारी रात्री 12 वाजता हे कुटुंब येथे पोहोचले आणि मुलीला घेऊन निघून गेले. या मुलीचे युट्यूबवर ४५ लाख इतके फॉलोअर्स आहेत.

भोपाळ रेल्वेचे एसपी हितेश चौधरी यांनी सांगितले की, औरंगाबाद पोलिसांना माहिती मिळाली होती की १७ वर्षीय एक युट्यूब स्टार आहे आणि ती बेपत्ता झाली आहे. बहुधा ती एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये चढली असावी. इटारसी येथील कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये शोध घेतला असता, किशोरी स्लीपर कोचमध्ये बसलेली आढळून आली. चाइल्ड लाईनच्या मदतीने तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मुलीचे कुटुंबीय रात्री 12 वाजता इटारसीला पोहोचले.

ही तरुणी लखनौला तिच्या मूळ गावी जात होती...

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी मुलीला काही कारणावरून रागावले होते. याच गोष्टीचा राग धरून ती घरातून पळून गेली. ती सध्या आपल्या कुटुंबासह औरंगाबाद येथे राहत असून ती मूळची लखनौ यूपीची आहे. घरी घडलेल्या या सगळ्या प्रकारानंतर ही मुलगी चिडून लखनौला जात होती. महाराष्ट्र पोलिसांनी तात्काळ शोध सुरू करून मुलीला लखनौला जाणाऱ्या ट्रेनमधून खाली उतरवले.

घरून निघून थेट रेल्वे स्टेशन गाठलं...

मुलीने सांगितले की, जेव्हा तिच्या वडिलांनी तिला रागावले तेव्हा मी रागाच्या भरात घरातून निघून थेट रेल्वे स्टेशनवर गेली आणि ट्रेनमध्ये बसली. माझे मूळ गाव UP मध्ये असल्याने मी यूपीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले होतो. रागाच्या भरात मी फोन आणायला विसरले. त्यामुळे माझा कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही.

या मुलीचे यूट्यूबवर ४५ लाख इतके फॉलोअर्स आहेत..

17 वर्षीय किशोरचे यूट्यूबवर 4.4 दशलक्ष म्हणजेच सुमारे 45 लाख फॉलोअर्स आहेत. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी त्यांचे व्हिडिओ खूप लोकप्रिय आहेत. किशोरीचे यूट्यूब चॅनल इतके लोकप्रिय आहे की तिला जॉईन करण्यासाठी फी भरावी लागते. हे शुल्क वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आहे.

तर शेवटी हाच प्रश्न निर्माण होतो की, आपल्या मुलाला किंवा मुलीला पालकांनी रागावले तर मुलं थेट घर सडून जाण्याचा विचार का करतात...? कुळांना काही चांगले वळण लावण्यासाठी पालक कधी कधी आपल्या पाल्यांवर रागावू शकतात पण हल्ली पालकांनी रागावल्यानंतर घर सोडून जाण्याचे मुलांचे प्रमाण वाढल्याने पालकांची चिंता आणखीन वाढली आहे...

Updated : 13 Sep 2022 4:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top