Home > News > 'मराठी पुरूष फ्लर्ट करू शकत नाहीत', असं ती का म्हणाली?

'मराठी पुरूष फ्लर्ट करू शकत नाहीत', असं ती का म्हणाली?

मराठी पुरूष फ्लर्ट करू शकत नाहीत, असं ती का म्हणाली?
X

हल्ली सोशल मिडीयावर कोण कसं व्यक्त होईल हे सांगता येत नाही. प्रत्येक जण सोशल मिडीयावर आपल्या खाजगी आयुष्यातील क्षण शेअर करतात किंवा काही जण सोशल मिडीया फावला वेळ घालवण्यासाठी वापरतात. ट्विटरवर ऐश्वर्या केरूरे या महिलेने 'मराठी पुरूष फ्लर्ट करू शकत नाहीत', असं ट्विट केलं.

आता यावर ऐश्वर्या ला अनेक मराठी पुरूषांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्यात काही सकारात्मक तर काही नकारात्मक प्रतिक्रीया आहेत. तर काहींनी तिच्याशी प्रतिक्रियांमधून फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रद्युम्न या ट्विटर युजर ने 'तुझं तोंड खराब असेल', अशी प्रतिक्रीया दिली आहे.

यावर ऐश्वर्याने देखील त्याला 'तुझा DP बघुन तर ते कन्फर्म होतंय' अशी प्रतिक्रीया दिली आहे.

अभिषेक तावरे या ट्विटर युजरने तर तिच्याशी 'काय सुंदर ते डोळे, काय निरागस ते हास्य, हास्यातून दिसणाऱ्या मोत्यांपुढे ते सोनं सुद्धा फिक दिसतय....हे हास्य अबाधित ठेवण्या मागचं कारण बनायला नक्कीच आवडेल', असं म्हणत फ्लर्ट केलं आहे.

प्रेम, रोमान्स, फ्लर्ट करणं या भावनिक गोष्टी अशा प्रकारे सोशल मिडीयावर व्यक्त करता येतात का? हे सारं व्यक्त करण्यासाठी तरूणाई सोशल मिडीयाचा वापर का करते हे जाणुन घेण्यासाठी आम्ही मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदिप पाटील यांच्याशी बातचित केली. ते म्हणाले, "खरं तर या ज्या कमेंट येत आहेत त्या सगळीकडे पसरतायत. डिजीटली व्यक्त होणं आणि प्रत्यक्ष भेटून व्यक्त होणं यात फरक आहे. डिजीटली आपल्याला हवं ते बोलता येतं परंतू त्या व्यक्तीचा काही अनुभव असतो त्यामुळे ते सारं बोलणं हे उथळ असतं. तिच गोष्ट जर समोर प्रत्य़क्षात व्यक्त झालो तर आपल्याला तपशीलात तसेच जास्त परीणामकारक ठरतात. आंतरव्यक्तिक संबंधांची जी भुमिका होती ती आता बदललेली आहे. आता या ज्या प्रतिक्रीया सोशल मिडीयावर येत असतात त्यावरून ही जी विचार करणारी मंडळी असतात ती फार गंभीर नसतात असं दिसुन येतं.", असं ते म्हणाले. त्यामुळे हल्ली सोशल मीडियावर कोण काय लिहेल आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रीया सुद्धा काय असतील याचा अंदाज लावणे अशक्य आहे.Why did she say 'Marathi men can't flirt

Updated : 13 Sep 2021 3:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top