Home > News > "महिला आमदारांप्रमाणे माझी देखील हीच खंत" अमोल मिटकरींनी का व्यक्त केली नाराजी.

"महिला आमदारांप्रमाणे माझी देखील हीच खंत" अमोल मिटकरींनी का व्यक्त केली नाराजी.

महिला आमदारांप्रमाणे माझी देखील हीच खंत अमोल मिटकरींनी का व्यक्त केली नाराजी.
X

विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन नुकतेचं पार पडलं. या अधिवेशनात अनेक मुद्दे चर्चेला आले आणि या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा प्रकर्षाने #MaxWoman ने समोर आणला तो म्हणजे महिला आमदारांना बोलण्यासाठी मिळणारा अपुरा वेळ.

महिलांना विधिमंडळात बोलण्याची संधी फार कमी मिळत असल्याचं वारंवार मॅक्सवुमनच्या माध्यमांतून निदर्शनास आणून दिलं आणि त्यानंतर अनेक महिला आमदारांनी देखील आपली ही खंत विधिमंडळात बोलून दाखवली. या सगळ्या विषयी पुरुष आमदारांना काय वाटतं हे देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला व याविषयी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी महिला आमदारांनं प्रमाणे मला देखील बोलण्याची संधी मिळाली नसल्याचे खंत व्यक्त केली.

विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला समान वेळ मिळत असतो. यामध्ये प्रत्येक पक्ष आपल्या आमदाराला त्यांच्या अनुभवानुसार वेळ दिला जातो. यामुळे नवीन निवडून आलेल्या आमदारांना प्रामुख्यानं अनेक प्रश्न मांडायचे असतात परंतु त्यांना बोलण्यासाठी अपुरा वेळ मिळतो. त्यामुळे महिलांना विधिमंडळात बोलण्यासाठी वेगळा स्वतंत्र वेळ द्यायला हवा त्याचबरोबर नवीन निवडून आलेल्या आमदारांना देखील बोलण्यासाठी ज्यादाचा वेळ मिळावा असं मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं. त्यांनी याबाबत काय म्हटला आहे पहा..


Updated : 26 March 2022 11:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top