Home > News > विधान परिषद निवडणूक कोणाला संधी मिळणार पंकजा मुंडे की चित्रा वाघ?

विधान परिषद निवडणूक कोणाला संधी मिळणार पंकजा मुंडे की चित्रा वाघ?

विधान परिषद निवडणूक कोणाला संधी मिळणार पंकजा मुंडे की चित्रा वाघ?
X

राज्यातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी २० जून ला निवडणूक होत आहे. या १० जागांमध्ये भाजपचे संख्याबळ पाहता भाजपचे ४ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.

या चार संभाव्य उमेदवारांमध्ये श्रीकांत भारती, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, पंकजा मुंडे यांच्यासह चित्रा वाघ यांचे नाव चर्चेत आहे.

पंकजा मुंडे या पक्षाच्या निष्ठावान नेत्यांपैकी एक आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांना भाजप संधी देणार असल्याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू आहे.

त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाव नेहमी प्रमाणे चर्चेत असले तरी चित्रा वाघ यांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कठोर भूमिका घेतलेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे भाजप चित्रा वाघ यांना ताकद देण्याची शक्यता आहे.

मात्र, चित्रा वाघ यांना संधी दिल्याने पक्षातील निष्ठावानांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना भाजप संधी देत असल्याची चर्चा निष्ठावान नेते व्यक्त करत आहेत.

Updated : 8 Jun 2022 2:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top