Home > News > पंकजा मुंडेंचा पत्ता कट करत विधान परिषदेचे तिकीट मिळवणाऱ्या उमा खापरे कोण?

पंकजा मुंडेंचा पत्ता कट करत विधान परिषदेचे तिकीट मिळवणाऱ्या उमा खापरे कोण?

पंकजा मुंडेंचा पत्ता कट करत विधान परिषदेचे तिकीट मिळवणाऱ्या उमा खापरे कोण?
X

राज्यसभा निवडणूकीपाठोपाठ आता विधानपरिषद निवडणूकिती कोण बाजी मारणार याची चर्चा सुरू आहे. मात्र या विधानपरिषद निवडणूकीसाठी भाजपने उमेदवारी दिल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याची मोठी चर्चा आहे. याचं कारण अस की विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळणार अशी चर्चा होती आणि अचानक पंकजा मुंडे यांना डावलून भाजपने उमा खापरे यांना तिकीट दिलं. आता सर्वांना हाच प्रश्न पडला आहे की पंकजा मुंडेंना डावलून तिकीट मिळवणाऱ्या या उमा खापरे नक्की कोण आहेत.

कोण आहेत उमा खापरे?

उमा खापरे या भाजपच्या अत्यंत आक्रमक नेत्या आहेत. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी भाजपमध्ये महिला मोर्चा प्रदेश सचिवपदासह संघटनेत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. भाजपमधील जुन्या नेत्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही ओळखल्या जातात. तसेच उमा खापरे या पिंपरी-चिंचवडच्या आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून चांगले काम केलं आहे. सलग दोनवेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलं आहे. 2001-2002 मध्ये त्या पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या.

दिपाली सय्यद यांच्यावरील टीकेने प्रसिद्धी झोतात

दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना नेते दिपाली सय्यद आणि उमा खापरे यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. मोदींवर आक्षेपार्ह टीका केली तर घरात घुसून चोप देऊ, असं जाहीर विधान खापरे यांनी केलं होतं. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. मात्र आता भाजपने विधानपरिषद उमेदवारी दिल्याने पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांचा पत्ता कट झाला आहे.

Updated : 19 Jun 2022 4:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top