Home > News > 21 कोटींच्या हेरॉइन सोबत पकडलेली महिला कोण?

21 कोटींच्या हेरॉइन सोबत पकडलेली महिला कोण?

21 कोटींच्या हेरॉइन सोबत पकडलेली महिला कोण?
X

मुंबई च्या घाटकोपर भागात मुंबई पोलिसांनी एका ड्रग विक्रेत्या महिलेला अटक केल्याची घटना घडली. अँटी नारकोटिक्स सेल विभागाने या महिलेवर ही कारवाई आहे. सदर महिलेकडे तब्बल २१ कोटी रूपये किंमतीचे ७ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या महिलेवर NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत महिला ही मुंबईतील टॉप ड्रग तस्करांपैकी एक आहे.

गेल्या १० वर्षांपासुन ही महिला ड्रग तस्करी करत आली आहे. याआधीदेखील मुंबई पोलिसांकडून दोन वेळा एकदा घाटकोपर युनीट ने तर एकदा वरळी युनीट सदर महिलेवर गुन्हे दाखल होते. सदर महिलेला तिसऱ्यांदा घाटकोपर युनीट ने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. या महिलेकडून तब्बल ७ किलो २०० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. ज्याची किंमत २१ कोटी रूपये इतकी आहे. राजस्थान मधून या महिलेला ड्रग्जचा पुरवठा केला जात होता. ह्युमन कुरिअर्सचा वापर करत मुंबईत ड्रग्ज आणले जात आहेत. राजस्थान ते मुंबई अशी एक ड्रग्ज सप्लाय चैन असल्याची माहिती पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी याबाबत पत्रकार परीषदेत दिली. मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज सप्लायर्सच्या विरोधात एक विशेष मोहिम चालवली जात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्ज तस्करांवर नजर ठेवली जात आहे. या मोहिमे अंतर्गतच सदर महिलेवर कारवाई झाल्याचे देखील पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

Updated : 20 Oct 2021 11:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top