कोण आहेत महिला हेड कॉन्स्टेबल सीमा ढाका?
X
पोलिसदलातील कर्मचाऱ्यांबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात शंका असतात. परंतू या शंकेला छेद देत राजधानी दिल्लीतील समयपूर बादली पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या एका महिला हेड कॉन्स्टेबलनं अडीच महिन्यांत 76 मुलांना शोधून काढले. यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांचे प्रमोशन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजधानी दिल्लीतील समयपूर बादली पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या एका महिला हेड कॉन्स्टेबलला आउट ऑफ टर्न प्रमोशन देण्यात आले आहे. हेड कॉन्स्टेबलप्रती असलेले त्यांचे समर्पण आणि प्रामाणिकपणा लक्षात घेता उच्च अधिका-यांनी त्यांना आउट ऑफ टर्न पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. महिला हेड कॉन्स्टेबल सीमा ढाकाने अडीच महिन्यांत 76 मुलांना शोधून काढले. यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांचे प्रमोशन करण्याचा निर्णय घेतला.
सीमा ढाका यांनी सापडलेल्या 76 मुलांपैकी 56 मुले 14 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत.दिल्ली पोलीस आयुक्त एन. एन. श्रीवास्तव यांनी सीमा ढाकाला आउट ऑफ टर्न प्रमोशनची घोषणा केली. त्यांना प्रोत्साहन योजनेंतर्गत पदोन्नती देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सीमा आउट ऑफ टर्न प्रमोशन मिळविणारी दिल्ली पोलिसांची पहिली कर्मचारी ठरली आहे. सीमा यांच्या मते, त्याच्यासाठी सर्वांत आव्हानात्मक बाब म्हणजे यावर्षी ऑक्टोबरमध्ये पश्चिम बंगालहून एका अल्पवयीन मुलाची सुटका करणे. पोलिसांच्या पथकाने मुलाला शोधण्यासाठी बोटींमध्ये प्रवास केला आणि पूरदरम्यान दोन नद्या ओलांडल्या.