Home > News > तीन शेळ्या तीन गाईची मालकीन झाली आमदार, विटेच्या घरात राहणाऱ्या चंदना बावरी कोण आहेत?

तीन शेळ्या तीन गाईची मालकीन झाली आमदार, विटेच्या घरात राहणाऱ्या चंदना बावरी कोण आहेत?

तीन शेळ्या तीन गाईची मालकीन झाली आमदार, विटेच्या घरात राहणाऱ्या चंदना बावरी कोण आहेत?
X

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पेक्षा एका महिलेची चांगलीच चर्चा आहे. या महिलेने ममता बॅनर्जी यांच्या प्रमाणे वृत्तपत्राच्या हेडलाईनची जागा व्यापली आहे. सामान्य व्यक्ती जेव्हा असामान्य कर्तृत्व करते. तेव्हा तिचं समाज कौतूकच करतो. पश्चिम बंगालच्या निवडणूकीत भाजपचा पराजय झाला असला तरीही चंदना बावरी या महिलेच्या विजयाने लोकशाहीची बीज किती खोलवर रुजली आहेत. हे दाखवून दिलं आहे. लोकांनी ठरवलं तर राजाचा रंक होतो.

आणि रंकाचा राजा... भारताच्या लोकशाहीत हे वारंवार समोर आलं आहे. चंदना बावरी या सर्वसाधारण महिलेने तृणमूल काँग्रेसचे उमेदवार संतोष मंडल यांचा 4145 मतांनी पराभव केला आहे. सामान्य महिलेने मिळवलेल्या या विजयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. चंदना बावरी यांच्या विजयाचा सुगंध अवघ्या भारतभर दरवळत आहे. मात्र, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही बाई नक्की कोण आहे. तिने तृणमूल कॉंग्रेसच्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव कसा केला? तर चंदना बावरी एक तुमच्या आमच्या सारखी सामान्य कुटुंबातील मनरेगा योजनेत काम करणारी महिला आहे. तिचा नवरा आजही गवंडी काम करतो. विटेच्या घरात राहणाऱ्या चंदना बावरी यांच्या घरात लाईट देखील नाही. आता तुम्ही तिची संपत्ती काय असा जर विचार करत असाल तर तिच्याकडे फक्त तीन बकऱ्या व तीन गाई एवढीच काय तिची संपत्ती.

मार्च महिन्यामध्ये ANI ने घेतलेल्या एका मुलाखतीत चंदना बाउरी म्हणतात- तिकीट मिळण्याअगोदर मला असं अजिबात वाटलं नव्हतं की, मला विधानसभा निवडणुकीसाठी एक उमेदवार म्हणून नामांकन मिळेल. अनेक लोकांनी मला नामांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्याच सुचवलं. पण मला ते शक्य होईल असं वाटलं नव्हतं. कोणाला केलं पराभूत... सालतोरा मतदार संघातून मागील दोन वेळा तृणमूल काँग्रेसचे उमेदवार स्वपन बारुई यांचा विजय झाला होता.

यावेळी निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून कुमार मंडल यांची निवड केली होती. या कुमार मंडल यांचा चंदना बाउरी यांनी पराभव केला आहे. एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना उद्देशून बोलताना ''आप की बेटी हमारी चंदनाजी ऐसे अनेक भाजपाओ कार्यकर्ताओ का चेहरा आपको लंबे समय तक याद रहेगा'' मोदींचं हे वाक्य खरं ठरलं आणि चंदना जी विजय झाल्या.

त्यांच्या या विजयानंतर अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होताना दिसत आहे. ट्विटरवर अनेक नेत्यांनी तसेच सामान्य नागरिकांनी एका सामान्य महिलेचा विजय असं म्हणत ट्विट केल आहे. भाजप नेते सुनील देवधर यांनी अत्यंत गरीब परिस्थिती असूनही विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. त्यांच्या ट्विटमध्ये ते म्हणतात - भाजपची उमेदवार चंदना बाउरी यांचा विजय झाला. ज्यांची आत्तापर्यंतची संपत्ती ही केवळ 31,985 इतकी आहे. त्या झोपडीमध्ये राहतात. एका गरीब मजुराची ही पत्नी.

त्यांच्या विजयामुळे भाजप समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. @sanjayshrivasthav,@sumirankomarraju, @abhijeetbasak यासारख्या असंख्य ट्विटर हँडलने कोणताही राजकीय संबंध नसताना एका सामान्य महिलेचा विजय असं म्हणत ट्विट केलं आहे.

Updated : 4 May 2021 7:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top